Deshi Jugaad : शेतात सर्व कामे करणारा ‘बुलेट ट्रॅक्टर’; एक लिटरमध्ये एका एकराची मशागत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतीमध्ये आधुनिक साधनांची (Deshi Jugaad) गरज वाढली आहे. मात्र, ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलित साधनांची किंमत जास्त असल्याने शेतकऱ्यांना ही साधने खरेदी करणे परवडत नाही. अशातच घडीला शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. विशेष म्हणजे अनेकजण जुगाड करून, शेतीसाठी कमीत कमी किमतीत मशागतीसाठी आधुनिक साधने आणि अवजारे कशी उपलब्ध होतील. यासाठी प्रयत्न करत आहे. आज आपण अशाच एका जुगाडू बुलेट ट्रॅक्टरबद्दल (Deshi Jugaad) जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना ऑर्डरनुसार पूर्तता (Deshi Jugaad Bullet Tractor)

सध्या अनेक जण आपापल्या पातळीवर ‘बुलेट ट्रॅक्टर’ची निर्मिती (Deshi Jugaad) करत आहे. लातूर जिल्ह्यातील मकबूल शेख यांनी देखील गेल्या चार वर्षांपासून बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती सुरु ठेवली असून, ते शेतकऱ्यांना गरजेनुसार ‘बुलेट ट्रॅक्टर’ ट्रॅक्टर बनवून देत आहे. मकबूल शेख हे व्यवसायाने टू व्हीलर मेकॅनिक असून, ते मागील चार वर्षांपासून ऑर्डरनुसार शेतकऱ्यांना ‘बुलेट ट्रॅक्टर’ बनवून देत आहे. तसेच विविध कृषी प्रदर्शनांमध्ये ते आपला ट्रॅक्टर ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कमी इंधनात अधिक काम

मकबूल शेख यांनी बनवलेल्या या ‘बुलेट ट्रॅक्टर’द्वारे (Deshi Jugaad) शेतामध्ये मशागतीसह, पेरणी, कोळपणी, वखरणी, डवरणी, फवारणी, उसाला माती लावणे, रोटाव्हेटर, पाळी घालणे, फवारणी करणे, ट्रॉलीतून माल वाहतूक करणे अशी सर्व कामे करता येतात. त्याचबरोबर एकाच वेळी २० फूटापर्यंतच्या क्षेत्रात फवारणी करता येते. त्याचबरोबर मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा या ट्रॅक्टरला कमी इंधन लागते आणि जास्त काम होते. त्यामुळे हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो.

काय आहे विशेषतः?

मेकॅनिक मकबूल शेख यांनी बनवलेला हा बुलेट ट्रॅक्टर एका लीटर डिझेलमध्ये सव्वा ते दीड तास सलग चालतो. एक एकराला प्रत्येक वेळी प्रत्येक कामाला त्याला केवळ १ लिटर डिझेल लागते. या ट्रॅक्टरला तीन चाकी ट्रॅक्टर म्हणून तयार करण्यात आले असून, त्याला १० एचपीचे इंजिन देण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर एकदम पॉवरफुल असून, तो कमी इंधनात अधिक काम करतो. शेतीमधील मशागतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅक्टर अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे त्याचे निर्माते मकबूल शेख यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!