Deshi Jugad : 23 वर्षीय मुलाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; मायलेज ऐकून चाट पडाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण भारत देश टॅलेंटच्या बाबतीत जराही मागे नाहीये. अशातच शेती क्षेत्रातील लोकांचे काही जुगाड (Deshi Jugad) पाहून, त्या क्षेत्रातील जाणकार आणि इंजिनिअर देखील चक्रावून जातात. अर्थात जुगाडू लोकांना सर्व अत्याधुनिक वस्तू उपलब्ध करून दिल्यास, ते अनोखी आणि प्रयोगशील वस्तूंची निर्मिती करू शकतात. आता अशाच एका मुलाने लाकूड आणि लोखंडाचा वापर करून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. अली कुमैल असे या मुलाचे नाव असून, त्याने तयार केलेल्या जुगाडू इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची (Deshi Jugad) सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.

23 वर्षीय मुलाची कमाल (Deshi Jugad Electric Tractor)

अलीकडेच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बाप्पासाहेब बावकर या शेतकऱ्याने स्प्लेंडर गाडीमध्ये काही बदल करून, मिनी ट्रॅक्टर बनवला होता. तर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी प्रवीण मते यांनी देखील आपल्या गाडीमध्ये काही बदल मिनी ट्रॅक्टर बनवल्याचे नुकतेच समोर आले होते. अशातच आता उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील 23 वर्षीय अली कुमैल या मुलाने जुगाडू इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. अली हा बिजनोर येथील एका एसी दुरुस्तीच्या दुकानात काम करतो. विशेष म्हणजे माफक आणि आहे त्या साधनांचा वापर करून, या मुलाने हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

60 किलोमीटर देतो मायलेज

अली कुमैल याने तयार केलेल्या या ट्रॅक्टरला 4 चार्जिंग बॅटरी (Deshi Jugad) दिल्या आहेत. या चारही बॅटरी पूर्ण चार्जिंग होण्यासाठी कमीत कमी 2 ते 4 तास लागत असल्याचे त्याने सांगितले आहे. अर्थात एकदा चार्जिंग केल्यानंतर आपला ट्रॅक्टर 60 किलोमीटर अंतरापर्यंत चालतो. अली कुमैल याने आपला हा ट्रॅक्टर बनवताना आपली जुनी लिथियम-आयन बॅटरी टाकली आहे. ज्यामुळे त्याला ट्रॅक्टर निर्मिती खर्च कमी आल्याचे तो सांगतो. त्याला हा संपूर्ण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवण्यासाठी जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च आल्याचे त्याने सांगितले आहे.

अली कुमैल याने या ट्रॅक्टरची निर्मिती करून केवळ स्वतःचा आयुष्यात प्रगती साधलेली नाही. तर त्याने दुसऱ्यांच्या देखील आयुष्यात आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काहीतरी नवीन करण्याची उर्मी निर्माण केली आहे. आजकाल अनेकांकडे विविध कल्पना असतात. मात्र, ते त्यांना वाट मोकळी करून देत नाही. ज्यामुळे त्यांच्या कल्पना शक्तीचा विस्तार होण्यास मर्यादा येतात. सध्या देशातील सरकार देखील तरुणांच्या नवकल्पना बाहेर कशा येतील. यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, आता अली कुमैल याने स्वतःच्या बुद्धीमतेच्या जोरावर हा छोटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवल्याने, तो नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

error: Content is protected !!