Deshi Jugad : आंबा बागेत माकडांचा हैदोस; करा ‘हा’ जुगाड; होईल 100 टक्के फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन (Deshi Jugad) घेतले जाते. प्रामुख्याने कोकण पट्टा आंबा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. याच कोकणात अनेकदा आंबा बागांवर माकडांचे आक्रमण झाल्याने आंदोलने झाली आहेत. याशिवाय माकडांची नसबंदी करण्याची मागणी देखील अनेकदा झालीत. अर्थात उन्हाळ्यात खायला काही नसल्याने माकडे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान करतात. मात्र, आज आपण एका शेतकऱ्याचा अनुभवातून समोर आलेला, आंबा बागेपासून माकडांना दूर ठेवण्याचा पर्याय (Deshi Jugad) पाहणार आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला हा उपाय करणे खूप सोपे जाणार आहे.

काय आहे ‘हा’ उपाय? (Deshi Jugad Monkeys In Mango Farm)

या शेतकऱ्याने म्हटले आहे की, “मी माझ्या मुख्य आंबा पिकापासून माकडांना दूर ठेवण्यासाठी विचारांती एक पर्याय (Deshi Jugad) सुचवला. सहज बसलेला असताना माकडांना आंबा आणि जांभूळ देऊन बघितले तर माकडे ही जांभळांकडे गेल्याचे दिसून आले. असे अनेकदा करून पाहिले असता तोच अनुभव आला. माकडांना आंब्याऐवजी जांभूळ हे फळ जास्त आवडते. त्यामुळे आंबा बागेत ठिकठिकाणी उपलब्ध जागेनुसार शक्य तितकी जांभळाची झाडे लावलीत. आंबा आणि जांभूळ हे पीक सोबतच्या हंगामात येत असल्याने माकडे ही जांभळांवर ताव मारून, आपल्या आंबा पिकाचे कोणतेही नुकसान करत नसल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

कीडींचाही प्रादुर्भाव कमी

इतकेच नाही आंब्याच्या बागेमध्ये ठिकठिकाणी जांभळांचे झाड लावल्याने, मावा किडींचा प्रादुर्भाव (Deshi Jugad) देखील कमी झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे आपल्याला किडींपासून तर संरक्षण तर मिळालेच. याशिवाय माकडांचा देखील हैदोस कमी झाला. आपल्याला एक कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून हा सल्ला मिळाला होता. त्यानुसार आपण माकडांसोबत आंबा आणि जांभूळ देण्याचा प्रयोग करून बघितला. त्यात आपल्याला आपल्या आंबा पिकाचे संरक्षण करण्यात 100 टक्के यश मिळाल्याचेही या शेतकऱ्याने म्हटले आहे.

जांभळाचे अनेक फायदे

जांभूळ हे भारतातील लोकप्रिय फळ आहे. विशेषत: कोकण पट्टा, गोव्यात उष्णकटिबंधीय हवामानात वाढणारे हे झाड आहे. जांभळाच्या व्यावसायिक फायद्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. पण आता त्याचे महत्त्व वाढत आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी जांभूळ महत्वाचे मानले जात आहे. फूड प्रोसेसिंगमध्येही जांभळाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ज्यूस आणि जेली इत्यादींमध्येही त्याची मागणी वाढली आहे.

error: Content is protected !!