Desi Gir Cow: भारतातील सर्वश्रेष्ठ देशी गीर गाय; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही काळात देशी गायीचे (Desi Gir Cow) महत्व याबाबत जागरुकता निर्माण झालेली आहे. ग्राहकांमध्ये सुद्धा देशी गायीचे दूध यामुळे होणारे फायदे माहित झाल्यावर या दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः गीर गायीपासून मिळणाऱ्या A2 दुधाला (A2 Milk) खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आज आपण गीर गायीचे (Desi Gir Cow) वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.

गीर गाय (Desi Gir Cow)

गीर गाय ही भारतातील श्रेष्ठ देशी जात असून गुजरात राज्यातील काठेवाडच्या दक्षिणेकडील गीर टेकड्या व जंगल हा या जनावरांचा मूळ प्रदेश आहे. ही गाय प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पाळली जाते.

या गायीला भोदली, गुजराती, सोर्थी, सुरती, काठियावारी आणि देशन या नावाने सुद्धा ओळखले जाते. गीर गायीपासून A2 हे सर्वोत्तम प्रकारचे दूध मिळते. या गायीचे दूध आणि तूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

शरीर रचना (Body Structure Of Gir Cow)

सुमारे 80 टक्के गीर गायींचा रंग लाल असतो. कान पानांसारखे झुकलेले आणि दुमडलेले असतात. डोळे बदामाच्या आकाराचे असून डोके जड व नक्षीदार असून चेहरा लांबड असतो. गीर गायीच्या शेपटीचे टोक गुंफलेले आणि काळे असते.

नर गायीची सरासरी उंची 159 सेमी आणि सरासरी वजन 544 किलो इतके असते. मादी गीर गायीची सरासरी उंची 130 सेमी आणि सरासरी वजन 310 किलोपर्यंत असू शकते.”

वैशिष्ट्ये (Features Of Gir Cow)

  • ही गाय जवळपास चार वर्षात प्रथम माजावर येते.
  • या गायीचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस असून सरासरी दूध उत्पादन 1700 लिटर असते.
  • गायीची प्रति दिवस दूध उत्पादन क्षमता 10 ते 12 लिटर एवढी आहे.
  • ब्राझील मध्ये अधिक चांगले व्यवस्थापन यामुळे ही गाय प्रति दुग्ध पानाच्या कालावधीत  सरासरी 3,500 लिटर पर्यंत दूध उत्पादन देते हे सिद्ध झाले आहे.
  • या गायीचे सरासरी आयुष्य 12 ते 15 वर्ष असते.  
error: Content is protected !!