Desi Jugaad : नाद करायचा नाय! एक लिटर डिझेलमध्ये 2 एकर कोळपणी, शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Desi Jugaad : देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. ऊस, सोयाबीन, कापूस, कांदा, गहू आणि तांदूळ यांसारखी पिके या ठिकाणी घेतली जातात. दोन तृतीयांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. मागील काही वर्षांपासून भारताच्या कृषी क्षेत्राचा चांगला विकास झाला आहे. अनेकजण शेतीसोबत जोडव्यवसाय करतात.

परंतु शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. राज्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. कोळपणी, पेरणीसाठी शेतकऱ्यांना खूप पैसे खर्च करावे लागत आहेत. (Desi Jugaad 🙂

शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड

आर्थिक बजेटचा विचार करता नांदेड मधील एका शेतकऱ्याने एक जुगाड केला आहे. जीवन पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून ते नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथील रहिवासी आहेत. ते आपल्या ट्रॅक्टरला कोळपणी यंत्र जोडून कोळपणी करत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ एक लिटर डिझेलमध्ये त्यांनी दोन एकर जमिनीची कोळपणी केली आहे.

त्यामुळे वेळ आणि पैशांचीही बचत केली जात आहे. त्यांचा हा भन्नाट प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी गर्दी करू लागले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयांवर आधारित व्हिडीओ पाहायला मिळतात. यात शेतीचे देखील खूप व्हिडीओ असतात. सोशल मीडिया आणि युट्युबचा वापर करून अनेक शेतकरी हटके जुगाड करत असतात. ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते.

आता अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून लाखो रुपयांची कमाई केली जात आहे. तुम्हीही कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त बाजाराची माहिती असावी.

error: Content is protected !!