Desi Jugad : खत पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याने बनवले घरच्याघरी भन्नाट जुगाड; होतोय मोठा फायदा; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Desi Jugad : शेती करायचा म्हटलं की खर्च हा होतोच. शेतकरी शेतीत अनेक नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करत असतात. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू झाली आहे. अनेक ठिकाणी पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. सोयाबीन, कापूस, हळद इत्यादींची लागवड शेतकरी सध्या करताना दिसत आहेत. त्याचबरोबर खत पेरणी हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये आता एका शेतकऱ्याने खत पेरणीसाठी एक भन्नाट जुगाड तयार केल आहे.

शेतकरी शेतीत कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त मिळावे म्हणून अनेक प्रयत्न करत असतात. यासाठी शेतकरी नवनवीन जुगाड वापरून शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. यामध्येच आता एका शेतकऱ्याने खत पेरणीसाठी एक देशी जुगाड बनवले आहे तेही अगदी घरगुती उपाय करून बनवले आहे. (Desi Jugad )

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असे शेतकऱ्यांनी बनविलेले जुगाड खरेदी करायचे असतील तर आताच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. अँप इंस्टाल केल्यानंतर तुम्हाला यामध्ये शेतकरी दुकान असा ऑप्शन दिसेल यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन शेतीसंबंधित अनेक वस्तू घेऊ शकतात. त्यामुळे शेतकरी असाल तर लगेचच प्लेस्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.

संपूर्ण जुगाड बनवायला किती खर्च आला?

शेतकऱ्याने अगदी घरच्या जुन्या वस्तूंपासून हे जुगाड बनवले आहे. यामध्ये आपल्या घरातील जार बॉटल तसेच लहान मुलांच्या सायकलचे चाक आणि काही लोखंडी वस्तू यासाठी वापरले आहेत. त्याचबरोबर एक पाईप देखील यासाठी वापरला असल्याचे दिसत आहे. खत पेरताना कमी जास्त प्रमाणात खत शेतामध्ये पडावे यासाठी या शेतकऱ्याने या यंत्राला एक कॉक देखील बसवला आहे. या कॉकच्या साह्याने शेतकरी खताचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे यंत्र बनवण्यासाठी फक्त १२०० रुपये खर्च आला आहे.

याची खासियत काय?

  • हे जुगाड कोणताही शेतकरी घरच्या घरी बनवू शकतो.
  • जुगाड बनवण्यासाठी खर्च खूपच कमी
  • या जुगाडा मुळे शेतीत खत पेरणे अगदी सोपे होत आहे.
  • मजुरांची जास्त आवश्यकता लागत नाही एक जण देखील या जुगाडाने खत पेरू शकतो.
  • हे यंत्र एकदम हलके असून आपण त्याला कोठेही घेऊन जाऊ शकतो.
error: Content is protected !!