Desi Jugad : विजेशिवाय चालतो ‘हा’ पंप, शेतकऱ्याने बनविले अनोखे जुगाड; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Desi Jugad : भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठ्या प्रमाणावर वाटा आहे. शेतकरी दिवस-रात्र शेतीत काबाडकष्ट करून उत्पादन घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अलीकडच्या काळात अनेकांचा कल पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे आहे. मेहनतीच्या जोरावर हे शेतकरी शेतीतून लाखोंची कमाई करत आहेत. परंतु, शेतकऱ्यांना शेती करत असताना अवकाळी पाऊस, पूर, शेतमालाला नसणारा भाव आणि विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा वीज नसल्याने शेती पंप चालू करण्यास अडचण येते. मात्र आता यावर एका शेतकऱ्याने भन्नाट जुगाड तयार केले आहे.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे कुठे मिळतील?

शेतकरी मित्रांनो आता शेती उपकरणे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांचे स्वतःचे व्यासपीठ बनवण्यात आले आहे. शेती उपकरणे सर्वात कमी किंमतीत विकत घ्यायची असतील तर गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करा. येथे अनेक प्रकारचे भन्नाट उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Hello Krushi अँपवरून तुम्ही कमी किंमतीत शेतीउपयोगी उपकरणे सहज विकत घेऊ शकता. यासोबत जमीन मोजणी, सातबारा डाउनलोड करणे, रोजचे बाजारभाव चेक करणे आदी सेवा या अँपवर मोफत दिल्या जातात.

अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नसल्याने खूप मोठा आर्थिक फटका बसतो. त्यावरही शेतकरी मात करतो. देशात जुगाड तंत्र वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकजण युट्युबवर किंवा इंस्टाग्रामवर व्हायरल व्हिडीओ पाहून जुगाड बनवतात. अशाच एका शेतकऱ्याने विना विजेच्या चालणाऱ्या पंपाचा जुगाड चर्चेचा विषय बनला आहे. याबाबतचा व्हिडीओ एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे.

शेतकऱ्याच्या जुगाडामुळे वेळेची होते बचत

एका शेतकऱ्याने विजेशिवाय चालणारा पंप बनवला आहे. या पाण्याच्या पंपाच्या बाजूला जमीन खोदून नळ जोडला असून एका बोर्डला लहान लहान बल्ब लावले आहेत. चाक फिरवताच त्या नळातून पाणी येते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शेतकऱ्याच्या या भन्नाट जुगाडामुळे वेळही वाचतो आणि विजेची बचतही होते. शिवाय कधीही हा पंप चालू करून शेतीला पाणी देता येते.

एका आयआरएस अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘१० एचपीचा पंप विजेशिवाय चालतो’, असे कॅप्शन दिले आहे. व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमुळे अनेकांना हा जुगाड आवडला असून त्या शेतकऱ्याला कशाप्रकारे हा उपाय सुचला असावा, असा प्रश्नही त्यांना पडला आहे.

error: Content is protected !!