Devendra Fadnavis : आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपये मिळणार – फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना (Devendra Fadnavis ) 4000 कोटी रुपयांचा फायदा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या अगोदर राज्य सरकारने राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4000 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.” असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.

रोष कमी करण्याचा प्रयत्न (Devendra Fadnavis On Farmers 4000 Crore Help)

यावर्षी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांनी कमी दराचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. अर्थात संपूर्ण हंगामात या दोन्ही पिकांचे दर हे खूपच कमी राहिले. ज्यामुळे आधीच दुष्काळी परीस्थिती त्यात योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचा राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर मोठा रोष आहे. हाच रोष कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या अगदी दोनच दिवस अगोदर मोठी घोषणा केली होती. ज्यात राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4000 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्याबाबत बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

युद्धजन्य परिस्थिमुळे दर घसरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले आहेत. तर राज्य सरकारने देखील 6 हजार रुपये दिले. जगभरात काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध, इराण-इस्रायल युद्ध या युद्धजन्य परिस्थिमुळे कापसावर निर्बंध आले आहेत. परिणामी कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव देशातील बाजारात दिसून आला. ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला नाही. मात्र, सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपयांचा फायदा दिला जाणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!