Dieback disease in Neem Trees: तेलंगणा (Telangana) आणि दक्षिणेकडील इतर राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कडुनिंबाच्या डहाळ्या, पाने सुकणे, आणि झाड वाळणे असे दृश्य दिसत आहे. १९९० च्या दशकात उत्तराखंडमधील डेहराडून (Dehradun in Uttarakhand) जवळील प्रदेशात या रोगाची नोंद झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये तेलंगणामध्ये ‘डायबॅक’ (Dieback disease in Neem Trees) रोगाची प्रथम ओळख झाली. २०२१ साली तेलंगाना सोबतच कर्नाटक, आंध्रप्रदेश, या राज्यात या रोगाचा (Dieback disease in Neem Trees) प्रसार वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
‘डायबॅक’ रोगाची कारणे (Causes Of Dieback Disease)
कडुनिंबाच्या झाडावर येणाऱ्या या रोगाला शास्त्रीय भाषेत ‘डायबॅक’ (Dieback disease in Neem Trees) म्हणजेच ‘मर रोग’ असे म्हणतात. ‘ट्वीग ब्लाईट’ (Twig Blight) नावाने सुद्धा या रोगाला ओळखतात. फोमोप्सिस अॅझाडिराक्टे’ (Phomopsis azadirachtae) बुरशीमुळे डायबॅक रोगाचा संसर्ग होतो. या बुरशीचा संसर्ग सर्व वयाच्या आणि आकाराच्या कडुनिंबाच्या झाडांना होतो.
- तज्ज्ञांच्या मते, खोडकिडीद्वारे (Stem Borer) कडुनिंबाच्या फांद्यांना छिद्रे पाडल्यानंतर या बुरशीजन्य रोगाचा (Dieback disease in Neem Trees) प्रसार वाढतो.
- उच्च आर्द्रता आणि हवामानातील बदल हे देखील डायबॅक रोगाच्या (Dieback disease in Neem Trees) बुरशीच्या प्रसारास जबाबदार आहे.
‘डायबॅक’ रोगाची लक्षणे (Symptoms Of Dieback Disease In Neem Trees)
- पावसाळ्याच्या सुरुवातीला या रोगाची लक्षणे दिसायला सुरुवात होते, आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस रोगाची तीव्रता वाढत जाते.
- मर रोगामुळे कडुनिंबाच्या झाडांची पाने, डहाळे आणि फुलोरा प्रभावित होतात. पाने कोमेजतात, पिवळी आणि नंतर तपकिरी होतात, पानगळ होते, खोड आणि फांद्या गडद आणि पोकळ होतात, शेवटी संपूर्ण झाड वाळते/ मरते. उत्पादनावर दुष्परिणाम होते
- विशेषतः जुनी झाडे लवकर प्रभावित होतात व वाळतात. नवीन किंवा जास्त जुनी नसलेल्या कडुलिंबाच्या झाडांवर या रोगाचा संसर्ग कमी प्रमाणात होतो, किंवा रोगाची लागण झाली तरी अशी झाडे टिकतात.
‘डायबॅक’ रोगासाठी एकात्मिक नियंत्रण उपाय (How To Treat Dieback Disease In Neem Tree)
या रोगावरील (Dieback Disease In Neem Trees) नियंत्रण पद्धती सोपी वाटत असली तरी आव्हानात्मक आहे. रोगास कारणीभूत असणाऱ्या बुरशीचे संक्रमण हवेतून होत असल्याने एका झाडावर नियंत्रण उपाय केल्यानंतरही शेजारच्या झाडाच्या बुरशीचे बीजाणू उपचार केलेल्या रोपाला/ झाडाला हानी पोहचवू शकतात.
बरेचदा मोठ्या झाडांवर बुरशीनाशक/ कीटकनाशकाची फवारणी करणे धोकादायक ठरू शकते, कारण प्रादुर्भावीत झाडाजवळ असणारी फुलपाखरे, मित्रकिडी यासाठी ही फवारणी हानिकारक ठरते. तसेच या फवारणीमुळे पाण्याचे स्त्रोत सुद्धा दूषित होऊ शकतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण उपायांचा योग्य प्रकारे आणि सावधगिरीने अवलंब करणे गरजेचे आहे.
- हा बीजजन्य आणि बीज प्रसारित रोग (Dieback Disease In Neem Trees) असल्यामुळे कडुनिंबाच्या बियांवर लागवडीपूर्वी बाविस्टीनची किंवा कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्माचा वापर रोपांचे आरोग्य सुधारून त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविते.
- नियमित लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी कडुनिंबाची रोपे लावावीत, झाडांची आणि रोपांची नियमित पाहणी करावी.
- रोगग्रस्त झाडांच्या आणि रोपांच्या फांद्या छाटून नष्ट करावे आणि झाडाला/रोपाला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचे मिश्रण लावावे.
- रोगग्रस्त झाडाभोवती खड्डा खणून त्यात कीटकनाशक + बुरशीनाशक + पाण्याचे मिश्रण तयार करून ओतावे.
रासायनिक नियंत्रण उपाय (Dieback Disease Chemical Control Method)
- प्रोफेनोफॉस 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात संपूर्ण झाडावर, पानांवर फवारणी करावी. यानंतर मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 125 डब्ल्यूपीचे मिश्रण दुसऱ्या दिवशी फवारावे
- काही संशोधनानुसार, सिस्टेनिक बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% हे हानिकारक रोग जनकांच्या विरूद्ध अत्यंत प्रभावी सिद्ध झाले आहे.
- कार्बेन्डाझिम 50% ची पानांवर फवारणी करावी.
- प्रादुर्भाव झालेल्या झाडांवर 1 ग्रॅम बाविस्टिन/लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.