Digital Crop Survey: धुळे जिल्ह्यात डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू; जाणून घ्या फायदे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: धुळे जिल्ह्यात ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’ (Digital Crop Survey) सुरु झाले आहे. केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारच्या (State Government) संयुक्त प्रयत्नांनी धुळे जिल्ह्यात डिजिटल पीक सर्वेक्षण (डीसीएस) सुरू करण्यात आले आहे. या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ 15 एप्रिलापासून करण्यात आला असून, त्याचा उद्देश पीक उत्पादन आणि क्षेत्रफळाबाबत अचूक माहिती गोळा करणे हा आहे (Digital Crop Survey).

यापूर्वी, ई-पीक पाहणी नावाच्या मोबाईल ऍप्लिकेशनचा (Mobile App) वापर करून शेतकरी पिकांची नोंदणी करत होते. आता डिजिटल क्रॉप सर्व्हेक्षण ऍप्लिकेशनद्वारे (Digital Crop Survey App) हे काम अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवले जाणार आहे.

प्रकल्पाचे फायदे (Digital Crop Survey Benefits)

अद्ययावत माहिती: डिजिटल पद्धतीने डेटा गोळा (Digital Data Collection) केल्याने, शासनाकडे (Government) पीक उत्पादन आणि क्षेत्रफळाची अचूक आणि वास्तविक माहिती उपलब्ध असेल.

सुधारित सेवा: या माहितीचा उपयोग विविध शासकिय योजना (Government Scheme) आणि सेवांसाठी, जसे की पीक विमा, अनुदान, आणि नुकसान भरपाई कार्यक्रमांसाठी केला जाईल.

शेतकर्‍यांना फायदा: शेतकर्‍यांना वेळेवर आणि योग्य मदत मिळण्यास मदत होईल. यासोबतच, डिजिटल पद्धतीने नोंदणी केल्याने त्यांना अनेक सुविधा मिळतील.

नोंदणी कशी करायची? (Digital Crop Survey)

डिजिटल क्रॉप सर्व्हेक्षण ऍप्लिकेशन Google Play Store वरून विनामूल्य डाउनलोड करा.

ऍप्लिकेशनमध्ये आवश्यक माहिती जसे की गाव, गट क्रमांक, पिकाचे छायाचित्र इत्यादी टाका.

तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची खात्री करा.

डीसीएस यशस्वी होण्यासाठी शेतकर्‍यांचा सहभाग गरजेचा आहे. शेतकर्‍यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून योग्य वेळी आणि अचूक माहिती देऊन या प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.

error: Content is protected !!