बाजरीच्या नव्या तीन वाणांचा शोध; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुधन विकासाच्या कार्यक्रमाला बळकटी आणण्याकरिता बाएफ (BAIF) संस्थेने १९७८ साली चारा पीक विकास कार्यक्रमाला सुरवात केली. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) या प्रकल्पास अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या केंद्राने संशोधित केलेल्या बाजरी पिकाच्या‘बाएफ बाजरा-१’, संकरित नेपियरचा ‘बाएफ संकरित नेपियर-१०’, ‘बाएफ संकरित नेपियर-११’, ‘बाएफ संकरित नेपियर-१४’ या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

या बरोबरीने संस्थेच्या उरुळीकांचन येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राने चाऱ्यासाठी बाजरीच्या ‘बाएफ बाजरा-५’ आणि ‘बाएफ बाजरा-६’ ही नवीन वाण विकसित केले आहेत. या दोन वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. हे दोन्ही वाण महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागवडीस प्रसारित करण्यात आली आहेत.

संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे, गट उपाध्यक्ष (संशोधन व पशुधन विकास) डॉ. अशोक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे प्रमुख प्रमोदकुमार ताकवले, कृषी विद्यावेत्ता राहुल काळे, वरिष्ठ संशोधन अधिकारी सागर जडे यांनी वाणांच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता.

वाणांची वैशिष्टे

१) पेरणीपासून ५५ ते ६० दिवसांमध्ये पहिल्या कापणीस तयार. दुसरी व तिसरी कापणी ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने. उन्हाळी हंगामात कमी पाण्यामध्ये व कमी कालावधीत जास्त चारा निर्मितीसाठी उपयुक्त.

२) उंच वाढणारे, रुंद, लांब व लव विरहित पाने, हिरवा पालेदारपणा, ३ ते ६ फुटवे, जाड रसाळ व मऊ ताट, जास्त हिरवा चारा उत्पादन देणारे, जोमाने वाढणारे व जलद पुनरुत्पादन.

३) ९ ते १० टक्के प्रथिने, १८ ते २० टक्के शुष्क पदार्थ. एकूण पचनीय घटक ५७ ते ५८ टक्के.

स्रोत : ऍग्रो वन

error: Content is protected !!