Donkey Farming : ‘हा’ शेतकरी करतोय 7 हजार रुपये लिटर दूध विक्री; बाजारात आहे प्रचंड मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गायी आणि म्हशीच्या दुधाच्या माध्यमातून अनेक शेतकरी भरघोस उत्पन्न (Donkey Farming) मिळवत आहेत. आज तुम्हाला 7 हजार रुपये प्रति लिटर दुध… हे वाचून धक्का बसला असेल. मात्र होय हे खरे असून, गुजरातमधील पाटण येथील शेतकरी धीरेन सोलंकी गाढव पालनातून (Donkey Farming) दुध व्यवसाय करत आहेत. या दुधाला 7 हजार रुपये लिटर, त्यापासून बनणाऱ्या दूध भुकटीला प्रति किलोसाठी सव्वा लाखांपर्यंत दर मिळत आहे.

गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील मणुंद गावचे धीरेन सोलंकी सरकारी नोकरीसाठी (Donkey Farming) प्रयत्न करत होते. मात्र दरमहा मिळणाऱ्या वेतनात घर खर्चही निघत नसल्याने, त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. माहिती मिळवत त्यांनी जवळपास 8 महिन्यांपूर्वी गाढवपालन करण्यासाठी 22 लाख रुपयांची गुंतवणूक करत, 20 गाढवांची खरेदी केली. ज्या गाढवास आपल्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. तेच गाढव आज धीरेन यांच्या कोटींच्या कमाईचे साधन बनले आहे. कारण जगातील सर्वाधिक महाग दूध हे गाढविणीचे मानले जाते. मात्र स्थानिक बाजारात या दुधाबाबत जास्त माहिती नसल्याने पहिले पाच महिने त्यांना उत्पन्न मिळाले नाही.

किती मिळतो दर? (Donkey Farming Farmer Dhiren Solanki)

धीरेन आपले दूध कर्नाटक आणि केरळ येथे पाठवत आहेत. सौंदर्य प्रसाधने निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये या दुधाला सर्वाधिक मागणी असल्याने, त्यास प्रति लिटर 5 ते 7 हजार रुपयांचा दर मिळत आहे. इतकेच नाही तर विदेशांमध्ये गाढविणीच्या दुधाच्या पावडरची किंमत 1 ते 1.25 लाख रुपयांपर्यंत आहे. दूध काढल्यानंतर त्यास शीतगृहात ठेवले जाते. त्यानंतर मागणीनुसार त्याची पाठवणी केली जाते.

किती मिळते दूध?

धीरेन यांच्याकडे सध्या 42 गाढव असून, आतापर्यंत त्यांनी 38 लाख रुपयांची गुंतवणूक या व्यवसायामध्ये केली आहे. एका गाढविणीपासून त्यांना दररोज 800 मिली दूध मिळते. एकूण दूध विक्रीतून महिन्याला त्यांना दोन ते तीन लाखांचा नफा मिळतो. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी त्यांना सरकारकडून कोणतेही अनुदान मिळालेले नाही. पौष्टिक असल्याने गाढवाच्या दुधाचा वापर नवजात बालकांसाठी संजीवनी मानला जातो. हे दूध अंत्यत पातळ आणि पांढरेशुभ्र असते. पाश्चिमात्य देशांमध्ये या दुधाला मोठी मागणी असते. त्यामुळे आता तुमचा गाढवाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

error: Content is protected !!