Double Coconut : भारतात एकमेव जुळ्या नारळाचे झाड; 25 किलो असते वजन, वाचा..किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे (Double Coconut) त्यातून उत्पन्न मिळेल अशा पिकांचा आधार घेत आहे. यात दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नारळ उत्पादन घेतले जाते. मात्र, आता तुम्ही कधी जुळ्या नारळाचे झाड पाहिले आहे का? शेतकरी साधारणपणे एका नारळाचे उत्पादन घेतात. मात्र, देशात एक झाड असे आहे. ज्याला एकाला एक असे दोन जुळ्या नारळाचे उत्पादन मिळते. हे ऐकून तुम्ही विचारात पडले असाल? मात्र हे पूर्णतः खरे असून, हे जुळ्या नारळाचे झाड इंग्रज काळात 1894 मध्ये इंग्रजांनी लावले होते. ते आजतागात असून, ते देशातील एकमेव जुळ्या नारळाचे (Double Coconut) झाड आहे.

परागीभवनासाठी अडचण (Double Coconut Tree In India)

हे जुळ्या नारळाचे झाड (Double Coconut) पश्चिम बंगालमधील कोलकाताजवळील हावडा येथील आचार्य जगदीश चंद्र बोस भारतीय वनस्पती उद्यान या ठिकाणी लावण्यात आले आहे. सध्या हे झाड नारळ शेतीसाठी मोठा संशोधनाचा विषय ठरत असून, त्याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे. प्रामुख्याने हे देशातील एकमेव झाड असल्याने त्यावर परागीभवनासाठी अडचण येत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, या झाडाला फळधारणा होण्यास अडचण निर्माण होत आहे.

आचार्य जगदीश चंद्र बोस भारतीय वनस्पती उद्यानाचे माजी संचालक एच.एस. देबनाथ यांनी म्हटले आहे की, “हे जुळ्या नारळाचे झाड (Double Coconut) जेव्हा 94 वर्षांचे होते. तेव्हा त्याला पहिल्यांदा फुल आले. मात्र, वनस्पतिशास्त्रीयदृष्ट्या या झाडासाठी परागीभवनासाठी दुसरे झाड नसल्याने फळधारणा होत नसल्याचे समोर आले आहे.” अर्थात जवळपास 1988 मध्ये या झाडाला प्रथम फुल आल्यानंतर तेव्हापासून या झाडावर संधोधन सुरु होते. ज्यात 2023 मध्ये यश आले असून, थायलंड येथील एका मेल नारळाच्या झाडाचे फुल परागीभवनासाठी आणण्यात आले. ज्यात संशोधकांना यश आले. या झाडाला फळधारणा होण्यास सुरवात झाली असून, ते परिपक्व होण्यास एक वर्ष लागते. ज्यामुळे या झाडापासुन लवकरच जुळ्या नारळाचे बीज मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

जुळ्या नारळाचे वैशिष्ट्ये?

दक्षिण आशियाई देशांमध्ये या प्रजातीचे झाडे आढळतात. मात्र, मात्र त्यांची संख्या अलीकडे खूपच कमी झाली आहे. या जुळ्या नारळाचे वजन हे जवळपास 25 किलो इतके असते. तर जवळपास अर्धा मीटरपर्यत लांब असते. विशेष म्हणजे आपल्या वेगळ्या गुण वैशिष्ट्यांमुळे हे नारळ खूपच महाग असते. 500 पाउंड म्हणजेच जवळपास एक नारळ हे 45 ते 50 हजारपर्यंत विकले जात असल्याचे सांगितले जाते.

error: Content is protected !!