Dr. MS Swaminathan : कृषी क्षेत्राचा गौरव, डॉ. एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून आज भारतरत्न पुरस्कारांची (Dr. MS Swaminathan) घोषणा करण्यात आली असून, हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासोबतच काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये दिली आहे. याबाबात त्यांनी तीन वेगवेगळ्या पोस्ट करून, या तिघांच्याही (Dr. MS Swaminathan) नावांची घोषणा केली आहे.

शेती क्षेत्रात समृद्धी आणली (Dr. MS Swaminathan Declared Bharat Ratna)

कृषी आणि देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन (Dr. MS Swaminathan) यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करत असताना आपल्याला मनापासून आनंद होत आहे. स्वातंत्र्यानंतर अतिशय आव्हानात्मक काळात स्वामीनाथन यांनी देशाच्या कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची वाटा उचलला. तसेच भारतीय कृषी क्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना काढले आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शीपणामुळे भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट तर झालाच, पण देशाची अन्नाची गरज भागविली गेली आणि शेतीला समृद्धीही मिळाली. मी त्यांना अतिशय जवळून ओळखत होतो. मी नेहमीच त्यांचे सल्ले, सूचना यांना महत्त्व दिले. असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

स्वामीनाथन आयोगाची विशेष चर्चा

स्वामीनाथन आयोग किंवा राष्ट्रीय शेतकरी आयोगची स्थापना हरित क्रांतीचे जनक डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 18 नोव्हेंबर इ.स. 2004 रोजी करण्यात आली. आयोगाने इ.स. 2006 पर्यंत एकूण 6 अहवाल सादर केले. या अहवालात आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचविले आहे. यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची तरतूद असावी, तसेच किमान आधारभूत किंमत (हमीभाव) अंमलबजावणीत सुधारणा करावी. या त्यांच्या तरतुदी आजही समाजमनात सतत चर्चेत असतात.

हरितक्रांतीचे जनक

भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांना जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला आहे. स्वामीनाथन यांना आतापर्यंत पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पद्म पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, वर्ड फूड प्राईस 1987, शांति स्वरूप भटनागर पुरस्कार 1961, जागतिक अन्न पुरस्कार 1987 हा कृषी क्षेत्रातील पहिला सर्वोच्च सन्मान आणि अल्बर्ट आईन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

error: Content is protected !!