Dragon Fruit Farming : जालन्याच्या शेतकऱ्याची कमाल! ड्रॅगन फ्रुट मधून कमावले 5 लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Dragon Fruit Farming : अनेक दुष्काळी भागामध्ये शेती करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जुगारच ठरत असतं. कारण की, या ठिकाणी एकदम तुरळक प्रमाणात पाऊस होतो. आणि जेवढा पाऊस झाला आहे तेवढा पिकासाठी योग्य नसतो. त्यामुळे अनेकदा येथील शेतकऱ्यांची पिके पाण्यामुळे जळली जातात. त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर एक मोठे आव्हान असते. दरम्यान जालना (jalna) जिल्हा देखील दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र येथील शेतकऱ्यांची सध्या चर्चा होताना दिसतं आहे.

रोजचे बाजारभाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करून घ्या

चर्चा होण्याचं कारण असं की, दुष्काळावर मात करत शेतीत नवनवीन प्रयोग करत. मोठे धाडस करत ड्रॅगन फ्रुट लागवडीतून या शेतकऱ्याने पाच लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. विठ्ठल डीखुळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी जालन्यातील साळेगाव या ठिकाणचा रहिवासी असून याच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. या शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात 12 बाय 7 च्या अंतराने ड्रॅगन फूड ची लागवड केली. याच्या लागवडीसाठी आवश्यक पूल आणि पाण्याच्या व्यवस्थेसाठी ठिबक सिंचन देखील केले. या शेतकऱ्याला ठिबक सिंचन करण्यासाठी जवळपास अडीच लाख रुपये तर रोपे खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये असे एकूण तीन लाख रुपयांचा खर्च आला. (Dragon Fruit Farming)

शेतकऱ्याला ड्रॅगन फूड लागवडीसाठी तीन लाखांचा खर्च आला असला तरी या शेतकऱ्याने त्यामधून जवळपास पाच लाख रुपये कमावले आहेत. पहिल्या बहारातच शेतकऱ्याला तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळाले. ते त्यांनी जवळपास 100 ते 150 रुपये भावाने विकले त्याचबरोबर यावर्षी चांगला बहार आल्याने 40 ते 45 क्विंटल उत्पादन झाले आहे. ते प्रति 150 ते 180 रुपये किलो भावाने त्यांनी विकले त्यामुळे यावेळी त्यांना चांगला नफा मिळाला आणि त्यांनी आतापर्यंतच्या विक्रीतून जवळपास पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे

या ठिकाणी मिळेल रोपवाटिकांची माहिती

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कोणत्या फळबागाची लागवड करायची असेल किंवा इतर कशाची लागवड करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळ कोणती नर्सरी आहे ते अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईल मध्ये समजणार आहे. यासाठी तुम्हाला आमचे Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. या ॲपमध्ये तुम्हाला रोपवाटिकांबद्दल सविस्तरपणे माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.

error: Content is protected !!