Drip Irrigation for Summer Cotton: उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धत आहे फायद्याची!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळी बागायती कापसाची (Drip Irrigation for Summer Cotton) लागवड करायची असते. कमी पाण्यात या पिकाचे नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. जाणून घेऊ या याविषयी सविस्तर माहिती.

राज्यात उन्हाळी बागायती कापसाची लागवड एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून ते मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केली जाते. अलीकडे बीटी कापसापासून भरघोस उत्पादन मिळत असल्यामुळे आणि कापसालाही चांगला बाजार भाव मिळत असल्यामुळे कापूस लागवड (Drip Irrigation for Summer Cotton) क्षेत्रातही दरवर्षी वाढ होत आहे.

उन्हाळी बागायती कापसाची लागवड ही उन्हाळी हंगामात उपलब्ध असलेल्या पाण्यावर अवलंबून असते आणि ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्यांनी उन्हाळी बागायती कापसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा (Drip Irrigation for Summer Cotton) वापर करावा यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवावे.

  • ठिबक सिंचन संचाचा सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त असल्याने ही पद्धत आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी कापसाच्या प्रचलित लागवड पद्धतीत बदल करून जोडओळ पद्धतीत कापसाची लागवड करावी.
  • मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेले प्रचलित पद्धतीत दोन ओळीतील 90 सें.मी. अंतर कमी करून 60 सें.मी. एवढे ठेवावे.  असे केल्याने दोन जोड ओळीत 120 सें.मी. एवढे अंतर राखले जाते.
  • प्रत्येक जोड ओळीसाठी एक उपनळी व उपनळीवर दोन झाडांसाठी 90 सें.मी. अंतरावर एक तोटी वापरावी. अशा प्रकारे उपनळयात 180 सें.मी. म्हणजे 6 फूट अंतर राखले जाते.
  • भारी जमिनीत कापसासाठी प्रचलित पद्धतीत शिफारस केलेले 120 सें.मी. अंतर कमी करून 90 सें.मी. ठेवावे. अशा पद्धतीत दोन जोड ओळीत 150 सें.मी. व दोन उपनळयात  240 सें.मी. म्हणजे 8 फूट अंतर राखले जाते.
  • जोड ओळीतील 90 सें.मी. अंतरावरील समोरासमोरील झाडांकरिता एकाच तोटीचा वापर करावा. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना ऑनलाईन प्रकारची उपनळी वापर करायला हरकत नाही. त्यामुळे जोड ओळीतील संपूर्ण पट्टा ओला होतो.

कापूस पिकात ठिबक सिंचनाचे फायदे (Drip Irrigation for Summer Cotton)

  • कापसाची प्रत व गुणवत्ता सुधारते.
  • पिकास पाण्याचा अजिबात ताण पडत नाही, त्यामुळे पात्या फुलांची गळ कमी होते.
  • ठिबक मधून खते देता येत असल्यामुळे खताच्या वापरात बचत होते.
  • कापसाची बोंडे चांगली पोसली जाऊन, वजनदार होतात.
  • पाणी, खते, वीज, मजूरांची बचत होते.
  • मुळांच्या कार्य क्षेत्रामध्ये वाफसा ठेवता येत असल्याने पाणी आणि खतांची कार्यक्षमता वाढते.
  • पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.
error: Content is protected !!