Drone Didi Scheme : तुम्हीही होऊ शकता ‘ड्रोन दीदी’; वाचा…काय आहे पात्रता, लागतात ‘ही’ कागदपत्रे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे ‘ड्रोन दीदी योजना’ (Drone Didi Scheme) होय. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी अल्प दरामध्ये आपल्या शेतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करता येणार आहे. याशिवाय या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देणे, हा आहे. मात्र, आता या योजनेच्या माध्यमातून ड्रोन दीदींची (Drone Didi Scheme) नेमणूक कशी केली जाते? त्यासाठीची पात्रता आहे? ग्रामीण भागातील कोणत्या महिला यात संधी आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊया…

मिळते 15 दिवसांचे प्रशिक्षण (Drone Didi Scheme For Farmers)

‘ड्रोन दीदी योजना’ ही केंद्र सरकारकडून 30 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरात एकूण 15,000 हुन अधिक महिलांची नेमणूक केली जाणार आहे. निवड झालेल्या या महिलांना 15 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. ज्यात त्यांना ड्रोन हाताळणी, पिकांवर कशा पद्धतीने फवारणी करायची याबाबत माहिती दिली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या सर्व ड्रोन दीदींना मासिक 15000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

काय आहे पात्रता?

  • संबंधित महिला ही बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे.
  • भारताचे नागरिकत्व असलेल्या महिलाच या योजनेसाठी पात्र असणार आहे.
  • कमीत कमी 18 वर्ष वय पूर्ण असावे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • ई-मेल आईडी
  • फोन नंबर
  • बचत गटाचे ओळखपत्र अनिवार्य
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

काय-काय फायदे मिळणार?

केंद्र सरकारच्या ‘ड्रोन दीदी योजना’ योजनेद्वारे निवड झालेल्या महिलांना 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. मासिक 15 हजार रुपये देखील मिळणार आहे. ही त्याच्या मानधनाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर सरकारकडून दिली जाणार आहे. या योजनेच्या केंद्र सरकार प्रामुख्याने देशभरातील 10 कोटीहुन बचत गटातील 15 हजार महिलांची निवड करणार आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांना सरकारकडून ड्रोन दिले जातात. या ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या शेतात फवारणी करण्याची जबाबदारी या ड्रोन दीदींवर असणार आहे.

error: Content is protected !!