Drone Technology : ‘या’ राज्यातील शेतकरी 100 रुपयात फवारणी करणार; कृषिमंत्र्यांची घोषणा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे तंत्रज्ञान (Drone Technology) भारतात वेगाने विकसित होत आहे. अशातच हरियाणा सरकारने एक मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांवर औषध फवारणीसाठी मोठा फायदा होणार आहे. हर‍ियाणा सरकारचे कृष‍िमंत्री जेपी दलाल यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पिकांना औषध फवारणी केल्यास त्यांना एक एकराच्या फवारणीसाठी केवळ 100 रुपये इतका माफक खर्च येणार आहे. ड्रोनद्वारे फवारणीसाठीचा (Drone Technology) बाकी सर्व खर्च हरियाणा सरकारकडून केला जाणार आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.

जनावरांसाठी रुग्णवाहिका सेवा (Drone Technology For Haryana Farmers)

शेतकरी व पशुपालकांचे उत्पन्न वाढवून त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी व पशुपालकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. हरियाणा सरकारकडून पशुपालनासाठीचे बजेट 400 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. हरियाणा सरकारकडून माणसांप्रमाणे जनावरांसाठीही रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने 70 वाहनांची खरेदी केली असून, लवकरच आणखी 130 वाहनांची खरेदी केली जाणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गाय, म्हैस किंवा अन्य जनावरे जखमी किंवा गंभीर आजारी पडल्यास, पशुवैद्यकिय सेवा त्यांना एका फोनद्वारे थेट घरपोच मिळणार आहे. असेही कृष‍िमंत्री जेपी दलाल यांनी म्हटले आहे.

सरकारचे ड्रोन वापरास प्रोत्साहन

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना ड्रोनच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. ड्रोन हे महाग असल्याने शेतकऱ्यांना त्यांची उपलब्धता होणे सध्या तरी अवघड आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भाड्याने ड्रोन देत शेतीचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर 2023 रोजी ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 15,000 महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्यास मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकार महिला बचत गटांना पुढील 4 वर्षांत ड्रोन उपलब्ध करून देणार आहे. या ड्रोनचा वापर खते व औषध फवारणी आदी शेतीविषयक कामांसाठी केला जाणार आहे. अशातच आता हर‍ियाणा सरकारचे कृष‍िमंत्री जेपी दलाल यांनी एका जाहीर कार्यक्रमात हे शेतकऱ्यांना केवळ 100 रुपयांमध्ये एकराची फवारणी करून मिळणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याचा हरियाणातील शेतकऱ्यांना फवारणीसाठी मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!