Drought : दुष्काळ निवारणासाठी 18 हजार कोटी द्या; सिद्धारमैया यांचे मोदींना साकडे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट (Drought) घेतली आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकातील दुष्काळ (Drought) निवारणासाठी केंद्र सरकारने 18 हजार 177 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या भेटीवेळी कर्नाटकचे अर्थमंत्री कृष्णा बायरे गौड़ा हेही उपस्थित होते. दरम्यान मागील महिन्यात कर्नाटक सरकारने याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेट घेत कर्नाटक सरकारने दुष्काळ (Drought) निवारण निधीची मागणी केंद्राकडे केली आहे.

सिद्धारमैया यांनी म्हटले आहे की, कर्नाटकातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीला (Drought) सामोरे जात आहेत. मात्र राज्यात काँग्रेसचे सरकार असल्याने केंद्राकडून यासाठीचा निधी देण्यासाठी उशीर केला जात आहे. कर्नाटक सरकार निधी देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहे. केंद्रीय अधिकऱ्यांच्या पथकाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यानंतर मागील महिन्यात कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारला निधी मागणीसाठीचे पत्रही पाठवण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारकडून निधी वितरणात उशीर करण्यात येत असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे.

महिनाभरापासून अहवाल पडून (Drought In Karnataka)

कर्नाटक सरकारने राज्यातील 236 तालुक्यांपैकी 223 तालुक्यांना दुष्काळी तालुके घोषित केले आहेत. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय कृषी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मागील महिन्यात कर्नाटक सरकारने मागितलेल्या दुष्काळ निधीबाबत बैठक आयोजित केली होती. कृषी विभागाने त्याबाबतचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. मात्र या अहवालावर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आणलेली नाही. अशी माहिती मिळालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ दुष्काळ निधी वितरित करत कर्नाटकातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

48.19 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

कर्नाटक सरकारकडून दुष्काळाबाबत केंद्र सरकारला पहिले निवेदन तीन महिन्यापूर्वी पाठवण्यात आले होते. याशिवाय केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने राज्यातील दुष्काळाची पाहणी करून दोन महिने झाले आहेत. राज्यात भीषण दुष्काळामुळे पीके पूर्णतः खराब झाली आहेत. राज्यात दुष्काळामुळे जवळपास 48.19 लाख हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचे 33 ते 100 टक्के नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. अशी माहितीही मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

error: Content is protected !!