Drought : राज्यातील नवीन 224 मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर; वाचा.. जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 मध्ये दुष्काळसदृश (Drought) परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी, ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत. अशा राज्यातील १९ जिल्ह्यांतील नव्याने स्थापित २२४ मंडळांमध्येही राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या नव्याने स्थापित मंडळांमध्ये सरकारच्या दुष्काळी (Drought ) सवलती लागू तातडीने लागू करण्यात याव्यात. याबाबत राज्य सरकारकडून शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.

४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित (Drought In Maharashtra)

दरम्यान, राज्यातील ४० तालुक्यांत याआधीच सरकारकडून दुष्काळ (Drought) घोषित करण्यात आलेला आहे. या तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील ज्या महसुली मंडळांत जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरीच्या ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा १०२१ महसुली मंडळांतही दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली होती. आता या १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुली मंडळांमध्ये देखील २२४ नवीन महसुली मंडळात देखील दुष्काळसदृश स्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या २२४ मंडळांमध्ये शेतकऱ्यांनाही राज्य सरकारच्या सर्व दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार आहे.

कोणत्या सवलती मिळणार?

  • जमीन महसुलात सूट
  • पीक कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू वीजबीलात 33.5 टक्के सूट
  • शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
  • आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
  • दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

१९ जिल्ह्यांमधील २२४ मंडळे

दरम्यान, २ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या नव्याने स्थापित महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यानिहाय महसूल मंडळांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पुणे -१४, सातारा – १२, सांगली -२, सोलापूर – १०, कोल्हापूर – ५, नाशिक -१३, धुळे – २३, जळगाव – २४, अहमदनगर – ३४, संभाजीनगर -१६, जालना – ३, परभणी – १३, हिंगोली – ७, नांदेड – ५, लातूर- ६, बीड -१९, धाराशिव – १०, नागपूर – ५, वर्धा – ३.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर – (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402161514569219.pdf)

error: Content is protected !!