Drought : दुष्काळाची कहाणी सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर; पहा नेमकं काय घडलं!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून राज्यातील दुष्काळाची पाहणी (Drought) केली जात आहे. एका पथकाकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तर दुसऱ्या पथकाकडून पुणे, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाची (Drought) पाहणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अधिकाऱ्यांना दुष्काळाची करून कहाणी सांगताना अश्रू तरळले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्यांने दुष्काळाची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पाय धरत ‘आता तुम्हीच आमचे माय बाप’ म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

कापूस, तूर पिकांची स्थिती बिकट (Drought Farmers Shed Tears)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक गावात जाऊन या दुष्काळी पथकाने (Drought) पाहणी केली. यावेळी सोयगाव तालुक्यातल्या धनवट गावात पोहचल्यावर विजय सोनवणे नावाच्या शेतकऱ्याने या पथकातील अधिकाऱ्याचे थेट पाय धरले आणि आपल्या झालेल्या नुकसानीची करून कहाणी सांगितली. याशिवाय या पथकाने जिल्ह्यातील जंगला तांडा येथील शेतकरी सुकलाल राठोड यांच्या शेतात जाऊन कपाशी आणि तुर या पिकांच्या बिकट परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांच्यासोबत संवाद साधत उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच केंद्राचे पथक धाराशिव जिल्ह्यातही या पथकाने पिकांची परिस्थिती, पाण्याअभावी रखडलेली पेरणी, चारा व पाणी टंचाईचा आढावा घेतला.

सोलापूरात विहीर तलावांची पाहणी

याशिवाय दुसऱ्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथून केली. या ठिकाणी शेतकरी सुनील मोहन हाके यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी पथकाने केली. शेतकरी दयानंद कोळेकर यांच्या विहिरीच्या पाणी पातळीची त्यांनी पाहणी केली. शिंगोर्णी येथे दुष्काळामुळे नुकसान झालेल्या मका पिकाची पथकाने नोंद घेतली तर सांगोला तालुक्यातील आचकदणी, महूद बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, ज्वारी, ऊस डाळिंब या पिकांची पाहणी त्यांनी केली आहे. याव्यतिरिक्त या पथकाने पाझर तलावाचीही प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आढावा घेतला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काय मदत मिळणार? याकडेच या शेतकऱ्यांचे लागून आहे.

error: Content is protected !!