Drought : आजपासून दुष्काळाची पाहणी; केंद्रीय पथक जाणार ‘या’ तालुक्यांमध्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, हे पथक राज्यातील विविध जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांचा आढावा घेणार आहे. या केंद्रीय पथकाचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आजपासून दोन दिवसीय दौरा असेल. यात प्रामुख्याने आज (ता.13) छत्रपती संभाजीनगर, जालना , बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांची पाहणी या पथकाकडून केली जाणार आहे. तर उद्या अर्थात 14 डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर, नाशिक, नंदूरबार, जळगावमध्ये हे पथक दुष्काळाची पाहणी (Drought) करणार आहे.

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. त्यात 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानंतर पुन्हा 178 तालुक्यांतील 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशा एकूण 218 तालुक्यांमध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांना किती मदत दिली जावी. यासाठी या पथकाकडून या भागांची पाहणी केली जाणार असून, त्यानंतर अहवाल केंद्र सरकारला सादर होईल. व केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा केली जाईल.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव दौरा (Drought Monitoring By Government)

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा) तालुक्यातील सावंगी, तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, डोणवाडी, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या 11 गावांमध्ये पथक दुष्काळ पाहणीसाठी येणार आहे. याशिवाय धाराशिव (जिल्हा) तालुक्यातील ताकविकी, करजखेडा, लोहारा तालुक्यातील मार्डी, लोहारा बु, माळेगाव, धानुरी, तावशीगड येथे पाहणी केली जाणार आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बोरी, वाशी, विजोरा व लोणखस शिवारात देखील केंद्रीय पथकाकडून पाहणी केली जाणार आहे.

पुणे सोलापूर दौरा

पुणे विभागात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांचा दौरा करणार आहेत. पुण्यातील बारामती व पुरंदर या गंभीर, तर इंदापूर, दौंड व शिरूर या तालुक्यांची पाहणी केली जाणार आहे. तर सोलापूरमधील बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला या तालुक्यांचाही या पाहणी दौऱ्यात समावेश असणार आहे.

error: Content is protected !!