Drought : दुष्काळाची दाहकता.. पाणी नसल्याने शेतकऱ्याने तोडली मोसंबी बाग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरकारकडून जवळपास 40 तालुक्यांसह 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाची दाहकता आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी आपली मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली आहे. पाणीच नसल्याने आता मोसंबीची झाडे जगवायची कशी असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी दुष्काळी (Drought) परिस्थितीला कंटाळून आपल्या बागेतील 200 झाडे तोडून टाकले असल्याचे समोर आले आहे.

200 मोसंबीची झाडे तोडली (Drought Farmer Cut Mosambi Plants)

शेतकरी बप्पासाहेब भानुसे हे पैठण तालुक्यातील असून, त्यांनी आपल्या शेतीमध्ये मागील पाच वर्षांपासून 200 मोसंबीची झाडे लहान मुलाप्रमाणे जपली होती. गेली चार पाच वर्ष पाणी पाऊस चांगला झाला. मात्र, यंदा पाण्याने ऐन खरिपात वाट्या दाखवल्या. ज्यामुळे यंदा भर उन्हाळयात मोसंबी बागेसाठी पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न त्यांना पडला होता. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये दुष्काळामुळे (Drought) त्यांच्या मोसबीला पाणी मिळणे, पूर्णपणे थांबले होते. ज्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी घरातील कुऱ्हाड घेत, मुलाप्रमाणे जपलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परिस्थितीसमोर हतबल

यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात पाऊस उशिरा पडला. त्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यात पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. ज्यामुळे यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये सर्वच बंधारे कोरडीठाक होती. तर मोठी धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही. तर परतीच्या पावसाने देखील अनेक भागांमध्ये ओढ दिल्याने, शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, ऐन उन्हाळाच्या तोंडावर पाच वर्ष जपलेली आपली कुऱ्हाडीने तोडून टाकण्याची वेळ शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांच्यावर आली.

शेतकरी चोहीबाजूने संकटात

कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांसमोर शेतकरी हतबल झाला. अशावेळी तो सरकारी मदतीचा ओढा करत असतो. मात्र, सध्या कष्टाच्या शेतमालाला भाव मिळत नाही. तेव्हा नुकसान झाल्याने मदत किती फिरून-फिरून येते. हे शेतकऱ्यांसाठी मात्र, आता शेतकरी शेतकरी बप्पासाहेब भानुसे याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी चोहीबाजूने संकटात सापडल्याचे अधोरेखित होत आहे.

error: Content is protected !!