Drought : …हे तर दुष्काळावरून लक्ष हटवण्याचे काम! पटोलेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. महागाई व दुष्काळ (Drought) या कचाट्यात सर्वसामान्य व शेतकरी वर्ग सापडला आहे. मात्र असे असतानाही राज्यातील तिघाडी सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. इतकेच नाही तर सरकार दुष्काळावरून (Drought) माध्यमांचे लक्ष विचलित करत असून, जाणीवपूर्वक मराठा समाज-कुणबी समाज आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केला जात आहे.” अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली आहे. ते मुंबई येथील टिळक भवन येथे माध्यमांशी बोलत होते.

“सध्या राज्यात दुष्काळाची गंभीर दाहकता असूनही सरकारकडून सर्व राज्यात दुष्काळ जाहीर केला जात नाही. केवळ मंत्र्यांचे आणि सरकारमधील आमदारांचे तालुके ‘दुष्काळग्रस्त तालुके’ म्हणून जाहीर केले जात आहेत. अशा रीतीने राज्याचे सरकार चालू शकत नाही. राज्यातील अनेक भागात 1 सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु झाले आहेत. यावरून राज्यातील दुष्काळाची गांभीर्यता लक्षात येते. मात्र या मूळच्या प्रश्नांवरून माध्यमांसह सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गाचे लक्ष विचलित व्हावे, यासाठी हेतुपुरस्कर समाजा-समाजामध्ये सरकारकडून वाद निर्माण केला जात आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.

राज्य पेटवले जात आहे (Drought In Maharashtra)

राज्य सरकारकडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम सुरु आहे. 2014 साली भाजपने मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. मात्र मागील 9 वर्षात भाजपने सत्तेत असूनही कोणत्याही समाजाला आरक्षण दिलेले नाही. भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्र पेटवला जात आहे. असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

जातनिहाय जनगणना करणार

राज्यात व केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास आरक्षण प्रश्नावर तोडगा काढू. या प्रश्नावर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व नेते राहुल गांधी यांनी ती जाहीरपणे मांडलेली असून, जातनिहाय जनगणना करणे व 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवणे हे मुद्दे काँग्रेस पक्षाच्या अजेंड्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!