Drought : दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात येणार; पहा कसा असेल दौरा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे 12 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक महाराष्ट्रात येणार आहे. 13 ते 15 डिसेंबर या दरम्यान या पथकाचा राज्यात (Drought ) दौरा असणार आहे. या पथकाकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात येणार आहे.

13 डिसेंबर रोजी उच्चपदस्थ अधिकारी (Drought ) दोन पथकांमध्ये विभागून पाहणी करणार आहे. यापैकी एक पथक छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांची तर दुसरे पथक बीड व धाराशिव जिल्ह्यांत दुष्काळाची पाहणी करणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर परिसरात एका पथकाकडून तर नाशिक व जळगावमध्ये दुसऱ्या पथकाकडून खरिपातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पाहणी नंतर काय? (Drought Monitoring By Central Team Maharashtra)

राज्यातील दुष्काळाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर 15 डिसेंबर रोजी या पथकाकडून पुण्यात बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर पथकाकडून केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल केंद्रीय मंत्री समितीसमोर ठेवला जाईल. त्यानंतर राज्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी राज्याला नेमकी किती मदत द्यायची? याची शिफारस या समितीकडून केंद्रीय कॅबिनेटला केली जाणार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर राज्याला दुष्काळासाठीच्या आर्थिक मदतीचे वितरण केले जाईल. केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकाच्या प्रमुख असणार आहेत.

शेतकऱ्यांना भरीव मदतीची आशा

यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पिके पूर्णतः हातातून गेली आहेत. कोकण आणि विदर्भात काही प्रमाणात पाऊस झाला मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सध्या भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. असाच काहीसा प्रकार रब्बी हंगामातही पाहायला मिळाला. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके हातची गेल्यानंतर शेतकऱ्यांनी फळबागा जगवल्या. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा दिला. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी या पथक दौऱ्यानंतर किती मदत दिली जाते, याकडे डोळे लावून बसले आहेत.

error: Content is protected !!