Drought : दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ; शेतकऱ्याने तोडली 500 झाडे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळाच्या (Drought) झळा तीव्र झालेल्या असून, अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच यंदा दुष्काळामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या फळबागा तोडण्याची वेळ आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने फळबागेला पाणी द्यायचे कसे? अशी चिंता असल्याने जालना जिल्ह्यातील निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी आपली मोसंबी बाग जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकल्याचे समोर आले आहे. आपल्या शेतातातील जवळपास ५०० मोसंबी झाडे (Drought) काढताना त्यांच्या डोळयात पाणी तरळले होते.

खर्च अधिक, उत्पन्न कमी (Drought Mosambi Jalna Farmer)

शेतकरी अंकुश खडके यांनी निधोना या आपल्या गावी अडीच एकरमध्ये मोसंबी बाग लावली होती. त्यांनी अडीच एकरातील जवळपास ५०० मोसंबी झाडांचे जतन गेली आठ वर्ष केले आहे. मात्र, आता यंदा पाण्याअभावी (Drought) व मोसंबी भाव मिळत नसल्याने ही झाडे जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकली आहे. सर्वसाधारणपणे मोसंबी बाग लावल्यानंतर, त्यापासून पाच वर्षांनी फळ मिळण्यास सुरुवात होते. त्यांना मागील तीन वर्षांपासून मोसंबी उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदाच्या दुष्काळामुळे त्यांना आपल्या मोसंबी बागेला मुकावे लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च अधिक उत्पन्न कमी असे म्हणण्याची वेळ आली आहे.

विहिरी बोअरवेल कोरडीठाक

बोअरवेल आणि विहिरीला पाणी नसल्याने आपण मोसंबी बाग जगवणे अवघड झाले आहे. सध्या आपल्याकडे पाण्याची भीषण परिस्थिती असून, सर्वच शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेल कोरडीठाक पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. परिणामी, कोणताही पर्याय नसल्याने आपण मोसंबी बाग काढून टाकत असल्याचे शेतकरी अंकुश खडके यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

दरम्यान, यावर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात सर्वच भागांमध्ये अल्प पाऊस झाला. ज्यामुळे यंदा राज्यातील सर्वच धरणामध्ये अपेक्षेपेक्षा खूप कमी पाणीसाठा झाला. परिणामी, यंदा रब्बी हंगामापासूनच शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला होता. मागील तीन ते चार वर्ष चांगले पाऊसमान राहिले होते. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड केली होती. मात्र, यंदा राज्यात जवळपास ४० तालुक्यांमध्ये, १०२१ मंडळांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात नामुष्की राज्य सरकारवर ओढवली. परिणामी, आता यावर्षीच्या दुष्काळात मोसंबी फळबाग जगवायची कशी? अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!