Drumstick Variety: शेवग्याच्या ‘थार हर्षा’ आणि ‘थार तेजस’ जाती; शेतकर्‍यांसाठी स्वयंपूर्णतेची संधी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेवगा (Drumstick Variety) हे हजारो वर्षांपासून आशियाई आणि दक्षिण अफ्रिकन देशांमध्ये औषधी उपयोगासाठी वापरली जाते. भारत हा शेवगा शेंगांचा मुख्य उत्पादक (Drumstick Cultivation) आहे. दक्षिणेकडील राज्ये शेवगा (Shevga) लागवडीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. डोळ्यांचा दाह, आतड्यांतील कृमी काढण्यासाठी, गरोदर आणि स्तनदा मातांना दूध उत्पादन वाढविण्यासाठी शेवग्याच्या ताज्या पानांची शिफारस केली जाते. शेवगा हा जळजळ, संसर्गजन्य रोग, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या या विकारांवर प्रतिबंधात्मक आणि उपाय (Drumstick Uses and Benefits) म्हणून वापरले जाते.

100 ग्रॅम ताज्या शेवग्याच्या (Drumstick Variety) (मोरिंगाच्या) पानामध्ये (Drumstick Nutrition) A आणि C जीवनसत्त्वे दैनंदिन गरजेपेक्षा तिप्पट प्रमाणात असते. या पानातून कॅल्शियमची दैनंदिन गरज आणि लोह आणि प्रोटीनची  निम्मी गरज पूर्ण होते.

परंतु शेवगा लागवडीला अनेक समस्यांचा सामना करावा लागत. त्यात शेंगा विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात हवामानामुळे शेवग्याचे उत्पादन कमी होते. त्यामुळे, दुष्काळी भागासाठी जास्त उत्पन्न देण्याऱ्या जातीची (Drumstick Variety) लागवड करणे आवश्यक आहे.

ही समस्या लक्षात घेऊन ICAR- केंद्रीय फलोत्पादन प्रयोग केंद्र, गोध्रा, गुजरात (Gujrat) यांनी शेवग्याच्या थार हर्षा आणि थार तेजस या कोरडवाहू भागात आणि शुष्क हवामानात (Rainfed Area) चांगले उत्पादन देणाऱ्या जाती (Drumstick Variety) निवड पद्धतीने विकसित केल्या आहेत.

थार हर्षा (Thar Harsha)

ही शेवग्याची (Drumstick Variety) गडद हिरवी पाने (54.5 सेमी लांब आणि 35.2 सेमी रुंदी) असलेली दाट फांद्या  असणारी व वार्षिक उत्पादन देणारी जात आहे. प्रकार आहे. फेब्रुवारी ते मार्च च्या तुलनेत थार हर्षा या जातीला उशिरा म्हणजे मार्च ते मे महिन्यात फळधारणा सुरू होते. प्रत्येक झाडाला एका वर्षात सुमारे 314 शेंगा लागतात. उत्पादन क्षमता 53-54.7 टन/हे.

या जातीत उच्च अँटिऑक्सिडंटचे प्रमाण आहे. थार हर्ष या शेवगा जातीच्या पानात आणि शेंगांमध्ये तुलनेने सर्वाधिक शुष्क पदार्थ, प्रोटीन, फॉस्फरस पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर, लोह, मँगनीज, जस्त आणि कॉपर असल्याची नोंद झालेली आहे

थार तेजस (Thar Tejas)

या शेवग्याची (Drumstick Variety) झाडे 265-318 सेमी पर्यंत वाढतात आणि 261.5 सेमी (पूर्व-पश्चिम) आणि 287.2 सेमी (उत्तर-दक्षिण) पसरतात. यामध्ये 2.74 मीटर झाडाची उंची, प्रति झाड 245 शेंगा लागत असून एका शेंगाचे वजन 218 ग्रॅम व लांबी 45-48 सेंमी असते. कोरडवाहू भागात शुष्क परिस्थितीत या जातीच्या प्रति शेंगा 9-10 बिया नोंदवल्या गेल्या. जानेवारी-मार्चमध्ये फळे परिपक्व होतात. तुलनेने लवकर फुलधारणा होणारी आणि लवकर परिपक्व होणारी ही जात  जानेवारी-मार्च दरम्यान काढणीस येते. थार तेजसच्या पानांमध्ये उच्च अँटिऑक्सिडंट, एस्कॉर्बिक ऍसिड, आढळून येते.

थार हर्षा शेवग्याच्या जातीने (Drumstick Variety) गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, झारखंड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये व्यावसायिक लागवडीद्वारे आणि घरगुती लागवडीद्वारे शेतकऱ्यांच्या पोषणात (Nutrition) लक्षणीय वाढ केली आहे.

गेल्या आठ वर्षात 375 एकर क्षेत्र या जातीच्या लागवडीखाली आले आहे. गुजरातमधील 850 हून अधिक आदिवासी शेतकर्‍यांना घरी लागवडीसाठी व त्यांच्या पोषण सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी लागवड साहित्य आणि बियांचे वाटप करण्यात आले. शास्त्रज्ञांनी या शेवगा लागवड (Drumstick Cultivation) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकर्‍यांना थार हर्षा जातीच्या व्यावसायिक लागवडीचे प्रशिक्षण दिले.

कजरा, पिलानी, झुंझुनू या भागातील प्रगतशील शेतकरी श्री प्रेम कुमार यांनी जुलै 2020 मध्ये सेंद्रिय उत्पादनासाठी व्यावसायिक पद्धतीने या जातीच्या शेवगा पिकाची लागवड केली त्यांना 12.24 टन/हेक्टर उत्पादन मिळाले.  त्यांना सरासरी लागवडीचा खर्च ₹ 125000/हेक्टर आलेला असून एकूण उत्पन्न रू. 306000/- ते 428500/हेक्टर/वर्ष मिळाले.   या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये सेंद्रिय शेवगा (Organic Drumstick) लागवडीची आवड निर्माण झाली आहे. शेवगा हे हिरव्या चाऱ्यासाठी देखील उपयुक्त आहे. शेवगा लागवड सेंद्रिय/नैसर्गिक शेतीसाठी करता येते, तसेच लोकांच्या शारीरिक पोषणात सुद्धा महत्त्वपूर्ण भर घालते.

error: Content is protected !!