Dudhi Bhopla Lagwad : दुधी भोपळा लागवड, ‘या’ चुका टाळा; ग्राहक खरेदीसाठी तुटून पडतील!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात भाजीपाला उत्पादक (Dudhi Bhopla Lagwad) शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भाजीपाल्याला बाजारात बाराही महिने मागणी असते. त्यामुळे त्यास बऱ्यापैकी भाव देखील मिळतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांमधुन पारंपारिक पिकांपेक्षा नेहमीच चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. भाजीपाल्यामध्ये काही शेतकरी हे दुधी भोपळ्याची लागवड करतात. मात्र, भोपळा पीक घेताना त्याच्या चवीबाबत शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या असते. अर्थात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भोपळा हा चवीला कडू लागत असेल, तर अशा भोपळ्याच्या उत्पादनानंतर त्यास ग्राहक मिळणे कठीण असते. परिणामी, शेतकऱ्यांनी भोपळा पीक घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून उत्पादित भोपाळ (Dudhi Bhopla Lagwad) हा कडवट लागत नाही. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

भोपळा कडू का लागतो? (Dudhi Bhopla Lagwad In Maharashtra)

कधी-कधी भोपळ्याचे उत्पादन घेताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास, उत्पादित भोपळा कडू लागतो. यात प्रामुख्याने थंड हवामान असलेल्या किंवा मग समुद्रसपाटीपासून अधिक उंच असलेल्या भागांमध्ये शेतकरी भोपळा उत्पादन (Dudhi Bhopla Lagwad) घेत असतील. तेव्हा ही समस्या जाणवते. याशिवाय वातावरणातील बदलांमुळे देखील ही समस्या जाणवत असते. यात तापमानात चढ-उतार, भोपळा लागवड केलेल्या जमिनीचा सामू कमी असणे, किंवा मग अचानक भोपळा पिकाला पाण्याच्या ताण पडणे ही प्रमुख कारणे असतात. याशिवाय लागवड केलेल्या जमिनीमध्ये पोषकतत्वे कमी असल्यास, याशिवाय तोडणी केल्यानंतर बाजारात नेईपर्यंत अयोग्य पद्धतीने हाताळणी करणे ही देखील कारणे त्यास कारणीभूत असतात. इतकेच नाही तर सायन्टिफिकदृष्ट्या शेतकऱ्यांनी केलेल्या भोपळ्यामध्ये कुकुर्बिटासिन या घटकाचे प्रमाण अधिक असेल. तर भोपळ्याला कडवटपणा लागतो.

करा ‘हे’ महत्वाचे उपाय?

1. भोपळा लागवड करताना शक्यतो मांडव पद्धतीने शेडनेट उभारणे आवश्यक ठरते. ज्यामुळे वातावरणीय बदलाचा परिणाम होत नाही.
2. सामू 5.5 ते 7 पर्यंत असलेल्या जमिनीची भोपळा लागवडीसाठी निवड करावी.
3. भोपळा पिकाला उच्च तापमानाचा फटका बसणार नाही, याची काळजी घ्यावी.
4. याशिवाय लागवडीनंतर काढणीपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.
5. जमिनीत पोषकतत्वे कमी असल्यास वेळोवेळी खतांची मात्रा द्यावी.
6. काढणीनंतर भोपळ्याची सुयोग्य पद्धतीने हाताळणी करावी.
7. भोपळ्यामध्ये कुकुर्बिटासिनचे प्रमाण कमी राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी भोपळ्यास नायट्रोजन खतांचा वापर करणे गरजेचे असते.

error: Content is protected !!