Dung Colour Business : गाईच्या शेणापासून इमारतीचा रंग निर्मिती; महिलांनी उभारला अनोखा ब्रँड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह भारतीय संस्कृतीमध्ये गायीला आणि गायीच्या शेणाला (Dung Colour Business) विशेष महत्व आहे. शेतीमध्ये शेणखत म्हणून वापर करण्यासह, गाईच्या शेणापासून विविध गोष्टींची निर्मिती केली जाते. ग्रामीण भागामध्ये गाईचे शेण अगदी सहज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकरी गायीच्या शेणापासून विविध व्यवसाय करू शकतात. आज आपण गायीच्या शेणापासून इमारतीचा रंग बनवणाऱ्या महिलांच्या रंग निर्मिती व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. या महिलांनी या व्यवसायातून (Dung Colour Business) मोठी प्रगती साधली असून, त्या त्यातून लाखोंची कमाई करत आहे.

शेणापासून बनवलेल्या रंगांची वैशिष्ट्ये (Dung Colour Business Woman Success Story)

सध्याच्या घडीला ग्रामीण भागामध्ये घर बांधणी क्षेत्र, शहरी भागातील इमारत बांधणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. ज्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरु केल्यास भविष्यात त्यातून तुम्हाला मोठी कमाई होऊ शकते. गायीच्या शेणापासून बनवलेले रंग हे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असतात. या रंगांमध्ये जिवाणू विरोधी आणि विषाणू विरोधी घटकांचा समावेश आहे. ज्यामुळे केमिकलयुक्त रंगांच्या तुलनेत गाईच्या शेणापासून बनवलेले रंग (Dung Colour Business) अधिक सुरक्षित असतात. याशिवाय ते घरातील वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. इतकेच नाही तर शेणापासून बनवलेले नैसर्गिक रंग गंधहीन असतात तसेच त्यांच्यामुळे मानवी त्वचेला हानी पोहचत नाही.

‘प्राकृतिक पेंट’ नावाने ब्रँड विकसित

हेच गुणधर्म लक्षात घेता उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील नवाबगंज येथील महिला व्यावसायिक मिथिलेश यांनी सहा महिलांना सोबत घेऊन गायीच्या शेणापासून इमारतीचा नैसर्गिक रंग बनवण्याचा व्यवसाय (Dung Colour Business) सुरु केला आहे. ‘प्राकृतिक पेंट’ या नावाच्या ब्रँडच्या व्यवसायातून या महिला स्वावलंबी झाल्या आहेत. महिला व्यावसायिक मिथिलेश यांनी म्हटले आहे की, बाजारामध्ये उपलब्ध असलेले रंग हे केमिकलयुक्त असल्याने ते हानिकारक असतात. मात्र, प्राकृतिक पेंट’ ब्रँडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले रंग, इमारतींसाठी भितींना आतून-बाहेरून वापरले जाऊ शकतात. अन्य रंगांच्या तुलनेत आपले ‘प्राकृतिक पेंट’ वाले रंग घर थंड ठेवण्यास मदत करतात.

व्यवसाय वृद्धीसाठी अल्प किमतीत विक्री

महिला व्यावसायिक मिथिलेश सांगतात, नवाजगंज या ठिकाणी आपण आपला रंग निर्मिती प्लांट उभारला आहे. आपल्या ‘प्राकृतिक पेंट’ ब्रँडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या रंगांमध्ये शिसे, क्रोमियम, आर्सेनिक, कॅडमियम असे कोणतेही धातूचे मिश्रण नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात सहजरित्या शेण उपलब्ध होत असल्याने, आपल्या ‘प्राकृतिक पेंट’चे रंग आपण बाजारात उपलब्ध रंगांच्या तुलनेत निम्म्या किमतीमध्ये विक्री करत आहोत. त्यामुळे आपले रंग नैसर्गिक असल्याने, माफक दरात उपलब्ध असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्यामुळे आपल्याला व्यवसाय वृद्धीसाठी मदत होत आहे. सध्या आपल्या या व्यवसायातून काही लाखांची कमाई होत असली तरी भविष्यात रंग निर्मिती व्यवसायाचा विस्तार आपली योजना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!