E-NAM License : शेतकऱ्यांनो, घरबसल्या काढा ई-नाम लायसन्स; वाचा… संपूर्ण प्रक्रिया!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती मालाचे अधिक उत्पादन घेता येते. मात्र, त्यांनी पिकवलेल्या या मालाला (E-NAM License) व्यवस्थित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. याला प्रामुख्याने कृषी माल विक्रीतील साखळी जबाबदार असून, ही साखळी नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-नाम’ची सुरुवात केली आहे. E-NAM (इलेक्ट्रॉनिक- नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) हा भारतातील कृषी माल विक्रीसाठीचा ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. या ‘ई-नाम’ ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शेतकरी परवाना काढून, आपला माल बाजार समित्यांना विक्री करू शकतात. मात्र, याबाबत अजूनही बरेच शेतकरी अनभिज्ञ असल्याने, आपण आज शेतकरी ‘ई-नाम’ ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा परवाना (E-NAM License) घरबसल्या कसा काढू शकतात. याबाबत जाणून घेणार आहोत.

काय आहे ई-नाम? (E-NAM License For Farmers)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांची शेतमालाच्या विक्रीची (E-NAM License) अडचण लक्षात घेऊन, ही ‘ई-नाम’ पोर्टल सुविधा सुरु केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी आपला शेतातील माल घरबसल्या बाजार समित्यांना विक्री करू शकतात. या पोर्टलवर सध्या देशभरातील 1000 हुन अधिक बाजार समित्या जोडण्यात आल्या आहेत. तसेच या पोर्टलवर बाजार समित्यांमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या सर्व मालाची माहिती आणि बाजारभाव माहिती देखील देण्यात आली आहे.

काय आहे ई-नामचा उद्देश?

ई-नाम पोर्टलवरील राष्ट्रीय कृषी बाजार योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना योग्य शेतमाल विक्री व्यवस्था उपलब्ध करून देणे. यासह योग्य दराची एक नियमित बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेनंतर्गत कृषी मालाच्या गुणवत्तेनुसार खरेदीदारांना लिलावात बोली लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना आपल्या जवळील 100 किमीच्या आतील बाजारपेठेतील शेतीमालाचे भाव या पोर्टलवरून कळू शकतात. चला तर मग पाहुया. ई-नाम पोर्टलवर आपला शेतीमाल विक्री करण्यासाठी घरबसल्या कसा परवाना काढायचा. यासाठी तुम्हाला ऑनलाईन आवेदन करावे लागणार आहे. त्याची संपूर्ण प्रक्रिया पुढे दिली आहे.

या स्टेप्स फॉलो करा

 • सर्वप्रथम ई-नामच्या enam.gov.in/web या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 • मुखपृष्ठावर असलेल्या ‘किसान भाई’ या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करा.
 • त्यानंतर तुमच्या ई-मेल आईडी संदर्भात माहिती भरा.
 • त्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
 • ज्याच्या माध्यमातून तुम्ही पोर्टलवर लॉग इन करू शकता.
 • पुन्हा तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल.
 • त्या ठिकाणी तुमच्या बाजार समितीसोबत जोडण्यसाठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • तुमच्या बाजार समितीची संपूर्ण माहिती भरा.
 • केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही निवडलेल्या बाजार समितीकडे मंजुरीसाठी पाठवा.
 • डॅशबोर्डवर लॉग इन केल्यानंतर शेतकरी सर्व बाजार समित्यांची माहिती पाहू शकतात.
 • तुमचा आवेदन अर्ज जमा करण्यासाही पोर्टलवरून ईमेल पाठवला जाईल.
 • तुम्ही निवडलेल्या जवळच्या संबंधित बाजार समितीने (एपीएमसी) मंजुरी दिल्यानंतर तुम्ही ई-नाम पोर्टलवर शेतमालाचा व्यवहार करू शकतात.
 • तुम्हाला याबाबत कोणतीही अडचण असल्यास तुम्ही आपल्या जवळच्या बाजार समितीत याबाबत संपर्क करू शकतात.
error: Content is protected !!