Ear Tagging : चारा छावणी, दूध अनुदान, लसीकरण, नुकसानभरपाईसाठी ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या पशुधनाची संख्या (Ear Tagging) मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेकदा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना आपल्या या पशुधनाला मुकावे लागते. किंवा मग संसर्गजन्य रोगराईमुळे पशुधनाचा मृत्यू होतो. अशावेळी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, आता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आपल्या पशुधनाचे ‘इअर टॅगिंग’ करणे बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीत चारा छावणीचा लाभ मिळण्यासाठी देखील ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक असणार आहे. तरच शेतकऱ्यांना चारा छावणींचा लाभ मिळेल, असे राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून (Ear Tagging) स्पष्ट करण्यात आले आहे.

चारा छावणीसाठी अडचण (Ear Tagging Mandatory)

इतकेच नाही यात तर शेतकऱ्यांना मिळणारे दूध अनुदान हे देखील याच ‘इअर टॅगिंग’च्या (Ear Tagging) माध्यमातून दिले जाते. त्यामुळे केंद्राच्या सूचनांनुसार ‘इअर टॅगिंग’ सध्याच्या घडीला दूध अनुदान आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा छावणी मिळणे शेतकऱ्यांना मुश्कील होऊ शकते. राज्य सरकारने याबाबत काही दिवसांपूर्वी शासन निर्णय जाहीर केला होता. या शासन निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार असल्याने उन्हाळ्यात उभारल्या जाणाऱ्या चारा छावण्यात आपली जनावरे दाखल करताना पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असेही कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सरसकट सर्वच पशुधनाचे ‘इअर टॅगिंग’ करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

‘इअर टॅगिंग’ का आहे महत्वाचे?

  • जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचा वन विभागाकडून बाजारमूल्यानुसार भरपाई मिळते. मात्र, त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जनावराचे मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी ‘इअर टॅगिंग’ आवश्यक आहे.
  • ‘इअर टॅगिंग’ नसेल तर राज्य सरकारकाच्या चारा छावण्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
  • दूध अनुदान मिळण्यासाठी ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक करण्यात आले आहे.
  • सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणादरम्यान लसीकरणासाठी ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक करण्यात आले आहे.
  • ‘इअर टॅगिंग’ नसेल तर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक करता येणार नाही.
  • पशुंच्या खरेदी-विक्रीसाठी ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक करण्यात आले आहे.
error: Content is protected !!