Ear Tagging : ‘इअर टॅगिंग’ का केले जाते? पिवळ्या पट्टीचे महत्व काय? वाचा.. माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दुग्ध व्यवसाय झपाट्याने वाढतो आहे. मात्र, डेअरी व्यवसायामध्ये (Ear Tagging) प्रगती करण्यासह शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांमधून जावे लागते. ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या लसीकरणासह अनेक योजना राबवल्या जातात. या सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची ‘इअर टॅगिंग’च्या स्वरूपात पशुपालन विभागाकडे नोंदणी करावी लागते. तेव्हाच शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे आज आपण जनावरांची ही ‘इअर टॅगिंग’ नेमकी का करतात? काय आहेत ‘इअर टॅगिंग’चे (Ear Tagging) फायदे? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘इअर टॅगिंग’ म्हणजे काय? (Ear Tagging For Cow, Buffalo)

अलीकडेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दूध अनुदान योजना लागू केली. त्यासाठी देखील दुधाळ गाईंचे ‘इअर टॅगिंग’ (Ear Tagging) झालेले असेल तरच अनुदान मिळेल. अशी अट सरकारकडून ठेवण्यात आली. अर्थात इअर टॅगिंग’ म्हणजे काय तर आपल्या गायींच्या किंवा जनावरांच्या कानांना पशुपालन विभागाकडून लावला जाणारा पिवळा बिल्ला किंवा पिवळा टॅग होय. या माणसाला ज्याप्रमाणे आधारकार्ड असते. अगदी त्याच पद्धतीने पिवळा टॅग म्हणजे त्या संबंधित जनावराचे आधारकार्ड असते. तो जनावरांच्या कानांना जोडला जाऊन, त्या जनावराची सर्व माहिती विभागाला एका क्लिकवर उपलब्ध होते.

जनावराची संपूर्ण माहिती

जनावरांच्या कानांना जोडलेला हा पिवळा टॅग सरकारला विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खूप महत्वाचा असतो. या टॅगमुळे संबंधित गाय किंवा म्हशीला आतापर्यंत कोणकोणत्या लसी देण्यात आल्या आहेत. याची माहिती तात्काळ समजते. तसेच एखाद्या आजाराची साथ पसरल्यास, अशा जनावराला पटकन लसीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे जनावरांना गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी या टॅगमुळे मदत होते. याशिवाय या टॅगमुळे जनावराचे वय, त्याच्या मालकाच्या नाव, त्यांचा संपर्क क्रमांक अशी सर्व माहिती उपलब्ध असते. ज्यामुळे दूध अनुदानासारख्या सरकारी योजनांमध्ये गैरव्यवहार न होण्यास मदत होते.

कुठे केले जाते ‘इअर टॅगिंग’?

दरम्यान, तुम्हांलाही सरकारच्या दूध उत्पाकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा मग एखाद्या रोगाबाबत जनावरास लसीकरण करायचे असेल. तेव्हा या टॅग खूप गरज पडू शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय विभागात जाऊन, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून तुमच्या जनावरांना हा टॅग लावून घेऊन शकतात. यासाठी तुम्हाला कोणताही अधिकचा खर्च येणार नाही.

error: Content is protected !!