Edible Oil Import : यावर्षी देशात 16.20 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील खाद्यतेल वर्षात (नोव्हेंबर 2022-ऑक्टोबर2023) जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या (Edible Oil Import) किमती नरमल्या होत्या. त्यामुळे 2022-23 या वर्षात भारतात खाद्यतेलाची आयात (Edible Oil Import) मोठ्या प्रमाणात होऊन, ती 169 लाख टन या सर्वोच्च पातळीवर पोहचली. मात्र आता 2023-24 या चालू खाद्यतेल वर्षात (नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024) भारतात 162 लाख टन खाद्यतेलाची आयात होऊ शकते. असे भारतीय खाद्यतेल उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी म्हटले आहे.

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आंतरराष्ट्रीय पामतेल संघटनेच्या (PIPOC) 2023 मधील ‘जागतिक अर्थशास्त्र आणि विपणन परिषदे’ला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “2023-24 या खाद्यतेल वर्षात भारतातील पाम तेलाची आयात 90 लाख टनांहुन अधिक राहण्याची शक्यता आहे. तर इतर वनस्पती तेलांची आयात ही 71.20 लाख टन इतकी राहण्याची शक्यता आहे. इतर वनस्पती तेलांमध्ये सामान्यतः सोयाबीन आणि सूर्यफूल या तेलांच्या आयातीचा समावेश असणार आहे.”

आयातीत 7 लाख टनांची घट (Edible Oil Import)

त्यामुळे आता आगामी काळात देशातील खाद्यतेलाच्या आयातीत ७ लाख टनांची घट नोंदवली जाऊ शकते. देसाई यांनी म्हटल्याप्रमाणे यावर्षी देशातील खाद्यतेलाची आयात कमी राहिल्यास याचा परिणाम म्हणून आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती काहीश्या वाढलेल्या दिसून येऊ शकतात. परिणामी त्याचा देशातील शेतकऱ्यांना फायदा होऊन सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता भविष्यात निर्माण होऊ शकते.

जागतिक पातळीवरील स्थिती काय आहे?

दरम्यान, सर्वात मोठा पाम तेल उत्पादक देश असलेल्या इंडोनेशियामध्ये 2023-24 या चालू खाद्यतेलाच्या वर्षात पाम तेलाचे उत्पादन 492.60 लाख टन इतके राहण्याची शक्यता आहे. तर मलेशियामध्ये 2023-24 मध्ये पामतेलाचे उत्पादन 188.50 लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या खाद्यतेल वर्षात 186.10 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मलेशियामध्ये यावर्षी 2.40 टनांनी पाम तेलाचे उत्पादन वाढणार आहे. याव्यतिरिक्त सध्या मलेशियात सध्या अतिरिक्त 27 लाख टन पाम तेलाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे एप्रिल-मे 2024 पर्यंत खाद्यतेल बाजारात अशीच जटिलता पाहायला मिळू शकते.

error: Content is protected !!