Edible Oil : गोडेतेलाच्या दरात 5 ते 8 रुपये किलोने घसरण होणार; सोयाबीन उत्पादक चिंतेत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने गोडेतेलाचे (Edible Oil) दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या उपाययोजना केल्या. वर्षभर बाहेरील देशातून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली. परिणामी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमल्याने, येत्या काही दिवसांत गोडेतेलाचे (Edible Oil) दर प्रती किलोमागे 5 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. असे खाद्यतेल व्यापारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

सर्वसामान्यांना दिलासा मिळणार (Edible Oil In India)

सध्याच्या घडीला बाजारात शेंगदाणा तेल 185 ते 220 रुपये किलो, सूर्यफुल तेल 110 ते 125 रुपये किलो, तर सोयाबीनचे तेल 91 ते 93 रुपये प्रति किलो दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सध्या सणासुदीसह लग्नसराईचा काळ आहे. ज्यामुळे बाजारात सध्या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारात पाहायला मिळणार असून, जमुळे गोडेतेलाच्या दरात 5 ते 8 रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे. ज्याचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘दुष्काळात तेरावा महिना’

खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण होणार असली तरी त्याचा सर्वाधिक फटका हा तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. गोडेतेलाच्या दरात घसरण झाल्यास साहजिकच सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा यांच्या दरात घसरण होणार आहे. त्यामुळे आधीच वर्षभापासून सोयाबीनचे दर घसरलेले असताना, त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खाद्यतेल, तेलबियांचा दर कमी होत आहे. याशिवाय केंद्र सरकारने खाद्यतेल आयात सुरूच ठेवली आहे. ज्यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाला मागणी वाढली आहे. अर्थात मागणी वाढूनही आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे देशातील खाद्यतेलाच्या दरात ही घसरण पाहायला मिळणार आहे.

error: Content is protected !!