Effect of Heat on Animal Pregnancy: उन्हाळ्यात जनावरे गाभण राहत नाही? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलाचा (Effect of Heat on Animal Pregnancy) जसे जनावरांचे आरोग्य, त्यांची कार्यक्षमता, दूध उत्पादन (Effect of Heat Milk Production) यावर परिणाम होतो, परंतु सर्वात जास्त परिणाम हा जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर (Animal Reproduction) होतो. उन्हाळ्यात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण फार कमी असते (Effect of Heat on Animal Pregnancy). जाणून घेऊ या मागची कारणे आणि त्यावर करता येणारे उपाय.  

जनावरे गाभण न राहण्याची कारणे (Effect of Heat on Animal Pregnancy)

  • उन्हाळ्यात उष्णतेमुळे जनावरे कमी चारा (Fodder) खातात आणि जास्त पाणी पितात. त्यामुळे रवंथ क्रिया कमी होऊन अपचन होते आणि त्यांच्या शरीरात आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते.
  • योग्य व संतुलित आहार (Balanced Diet) न मिळाल्याने खनिजे व जीवनसत्त्वांच्या तसेच काही विशिष्ट संप्रेरकाच्या कमतरतेमुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
  • जनावरांच्या गर्भाशयाचे मुख माजाच्या काळात व विल्यानंतर उघडे असते. या काळात जनावरांचा गोठा घाण असेल तर जंतूसंसर्ग (Bacterial Infection In Animal) होण्याचा धोका असतो. हा जंतूसंसर्ग घाणीतून योनीमार्गाने गर्भाशयात जाऊन गर्भाशयाचा दाह होतो यामुळे सुद्धा जनावरे गाभण राहण्यास अडथळा निर्माण होतो.
  • उन्हाळ्यात उपलब्ध होणारा चारा कमी पौष्टिक आणि प्रथिनयुक्त असतो. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जनावरांची वाढ मंदावते, उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते.
  • जनावरांच्या घामावाटे सोडियम आणि पोटॅशियम सारखे क्षार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे क्षारांची शरीरात कमतरता निर्माण होते, यामुळे सुद्धा जनावरे गाभण राहण्यास अडथळे निर्माण होते.
  • उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरात ताण (Heat Stress) निर्माण होतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते. तसेच, उन्हामुळे जनावरांची लैंगिक इच्छा कमी होते.

परिणाम (Effect Of Heat Stress On Animal Pregnancy)

वरील सर्व कारणांमुळे जनावरांचे उन्हाळ्यात गाभण राहण्याचे प्रमाण (Effect of Heat on Animal Pregnancy) कमी होते. आणि जनावरे गाभण राहिली तरी गर्भपाताचे प्रमाण वाढते. जनावरात प्रजनना संबंधित अडचणींमुळे वेतामधील अंतर वाढते, प्रजननक्षमता कमी झाल्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होते.

उपाय योजना (Remedy On Effect of Heat Stress In Animal)

  • उन्हापासून जनावरांना बचावासाठी हवेशीर निवारा उपलब्ध करून द्यावा, त्यांना सावलीत बांधावे.
  • उन्हाळ्यात जनावरांना पौष्टिक आणि संतुलित आहार द्यावा यामध्ये हिरव्या चाऱ्यासोबतच दाणे आणि खनिज मिश्रण द्यावे.
  • जनावरांना स्वच्छ आणि थंड पाणी पुरवठा करा.
  • योग्य वेळी कृत्रिम रेतनद्वारे (Artificial Insemination in Animals) जनावरांचे प्रजनन करावे.
  • जनावरांमध्ये प्रजनन क्षमतेची समस्या असल्यास पशु वैद्याची मदत घ्या.
  • जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जनावरांना दररोज 50 ग्रॅम खनिज मिश्रण (Mineral Mixture) द्यावे.
  • उन्हाळ्यात म्हशींचा माज ओळखून वेळीच रेतन करावे.
  • सकाळी जनावरांचे निरीक्षण करून माजाची लक्षणे ओळखा, जनावरांना योग्य वेळी फळवा
error: Content is protected !!