Eggs Export : मालदीवला अंडी निर्यात सुरळीत सुरू; तणावपूर्ण संबंधांचा परिणाम नाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मालदीवबाबत सध्या सुरु असलेल्या चर्चेमुळे पोल्ट्री उद्योजकांमध्ये (Eggs Export) भीतीचे वातावरण आहे. त्याला कारणही तसेच असून, देशातील एकूण अंडी निर्यातीपैकी 80 टक्के निर्यात भारतातून मालदीव या देशाला केली जाते. अंडी उत्पादकांसाठी मालदीव ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारत आणि मालदीव यांच्या संबंधामध्ये कटूपणा निर्माण झाला आहे. याचा परिणाम देशातील अंडी निर्यातीवर (Eggs Export) होणार का? अशी भीती पोल्ट्री उद्योजकांना सतावत आहे.

देशातील दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिलनाडू या राज्यांमधून कोची विमानतळावरून मालदीव या देशाला दररोज जवळपास 20 कंटेनर अंडी निर्यात (Eggs Export) केली जातात. जी भारतातील एकूण अंडी निर्यातीपैकी 80 टक्के इतकी निर्यात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धानंतर श्रीलंका आणि मालदीव भारतीय अंड्यांचे सर्वात मोठे खरेदीदार देश बनले आहे. याशिवाय भारतातून अरब देशांमध्ये मुख्यतः संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशांनाही मोठ्या प्रमाणात अंडी निर्यात केली जाते. मात्र आता मालदीवबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे अंडी उत्पादकांमध्ये धास्ती आहे.

अंडी निर्यातीवर परिणाम नाही (Eggs Export To Maldives Continues)

पोल्ट्री उद्योगातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, कोची येथील विमानतळावरून मालदीव या देशासाठी सुरु असलेली अंड्यांची निर्यात सुरळीत सुरु आहे. मालदीवबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीती घातली जात आहे. मात्र सध्या मालदीव या देशाला दक्षिणेकडील राज्यांमधून सुरु असलेली निर्यात पूर्णपणे सुरळीत सुरु आहे.

विविध देशांमधील अंड्यांचे दर

उपलब्ध आकडेवारीनुसार, कोंबडीची सर्वात स्वस्त अंडी भारतात मिळतात. भारताच्या घाऊक बाजारात अंडी 79 रूपये डझन आहेत. तर सर्वात महाग अंडी ही 560 रुपये प्रति डझन स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. भारतात सध्या प्रति अंडे 6.50 रूपये दर असताना, स्वित्झर्लंडमध्ये नागरिकांना प्रति अंडयांसाठी 47 रुपये मोजावे लागतात. भारतानंतर रशिया या देशामध्ये 84 रुपये प्रति डझन, पाकिस्तानमध्ये 90 रुपये प्रति डझन, इराणमध्ये 95 रुपये प्रति डझन, चीनमध्ये 149 रुपये प्रति डझन, न्यूझीलंडमध्ये 456 रुपये प्रति डझन, यूएसए आणि डेन्मार्कमध्ये 359 रुपये प्रति डझन अंडी विकली जात आहेत.

error: Content is protected !!