Eggs Rate : अंड्याच्या दरात 20 ते 25 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अंडी बाजार (Eggs Rate) मागील तीन आठवड्यांमध्ये पत्त्यांसारखा कोसळल्याचे पाहायला मिळाले. आज महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांमध्ये अंड्याचे दर सरासरी शेकडा 500 रुपयांपर्यंत खाली आले आहे. चार दिवसांपूर्वी अंड्याला बाजारात 460 ते 550 रुपये प्रति शेकडा दर मिळत होता. मात्र आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात घसरण होऊन, ते 450 ते 530 रुपये प्रति शेकड्यापर्यंत खाली आले आहे. अर्थात मागील चार दिवसांत पुन्हा अंडी दर 20 ते 25 रुपये प्रति शेकड्याने घसरले आहेत. तर मागील तीन आठवड्यातील अंडी दरात (Eggs Rate) 80 ते 100 रुपये प्रति शेकडा इतकी तूट नोंदवली गेली आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (530), पुणे (530), नागपूर (500), वाराणसी (523), लखनऊ (533), पटना (515), अलाहाबाद (514), कोलकाता (505), कानपुर (510), रांची (505), अहमदाबाद (515) , चेन्नई (530), बंगळुरू (520), विजयवाडा-आंध्रप्रदेश (463), लुधियाना (453), दिल्ली (485), हैद्राबाद (463), अजमेर (475), सुरत (530), इंदोर (505), चिंतुर-तामिळनाडू (523). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये मागील चार दिवसांमध्ये अंड्याचे दर 20 ते 25 रुपये प्रति शेकडा इतके घसरलेले दिसून आले आहे.

उन्हाची तीव्रतेमुळे मागणीत घट

दरम्यान, डिसेंबर 2023 या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति शेकड्यापर्यंत पोहचले होते. मात्र सध्या अनेक भागात अंडी दर हे 450 ते 530 रुपये प्रति शेकडा दराने विक्री होत आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून, त्याचा थेट परिणाम पोल्ट्री व्यवसायावर झाला आहे. इतकेच नाही तर उत्तरेकडील राज्यांमध्ये देखील अंड्याच्या मागणीत मोठी घट नोंदवली गेली आहे. ज्यामुळे सध्या अंडी दराला उतरण लागल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय राज्यांमध्ये अंडी दर 500 ते 530 रुपये दरम्यान टिकून आहेत. मात्र दक्षिणेकडील तामिळनाडूसह सर्वच राज्यांमध्ये अंड्याचे दर हे शेकडा 500 रुपयांहुन खाली घसरले आहे.

error: Content is protected !!