Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 35 ते 40 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अंडी मार्केट (Eggs Rate) गेल्या महिन्यापासून सातत्याने दर घसरणीचा सामना करत आहे. अशातच मागील दोन ते तीन दिवसांमध्ये अंडी दरात पुन्हा प्रति शेकडा 35 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. ज्यामुळे गेल्या आठवड्यात 450 ते 535 रुपये दरम्यान असलेले प्रति शेकडा अंड्याचे दर सध्या 410 ते 500 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आले आहे. अर्थात अंडी दरात (Eggs Rate) चालू आठवड्यात 35 ते 40 रुपये प्रति शेकडा इतकी घसरण पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे सध्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (500), पुणे (500), नागपूर (460), वाराणसी (500), लखनऊ (500), पटना (495), अलाहाबाद (481), कोलकाता (490), कानपुर (490), रांची (476), अहमदाबाद (475) , चेन्नई (530), बंगळुरू (490), विजयवाडा-आंध्रप्रदेश (433), लुधियाना (430), दिल्ली (460), हैद्राबाद (410), अजमेर (430), सुरत (500), इंदोर (460), चिंतुर-तामिळनाडू (523). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये चालू आठवड्यात अंड्याचे दर 35 ते 40 रुपये प्रति शेकडा इतके घसरलेले दिसून आले आहे.

तापमानवाढीमुळे अंडी दर उतरणीला

देशातील अंडी दरावर (Eggs Rate) हवामानाचा सर्वाधिक बदल होत असतो. परिणामी, महाराष्ट्रासह देशातील भागांमध्ये जसेजसे तापमान चढतीला लागले आहे. अगदी त्याउलट अंडयाचे दर हे उतरणीला लागले असून, मागील महिनाभरात अंडी दराने मोठी घसरण अनुभवली आहे. ज्यामुळे देशभरातील अंडी शौकिनांना दिलासा मिळाला आहे. मात्र, असे असले तरी पोल्ट्री उत्पादक मात्र मोठ्या आर्थिक संकटांतून जात आहे. आधीच पोल्ट्री खाद्याचे वाढलेले दर, त्यात खाद्यासाठी उपलब्ध न होणारा मका यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. याउलट घसरलेल्या अंडी दरामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.

error: Content is protected !!