Eggs Rate : अंड्याच्या दर घसरणीने तळ गाठला; पहा आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Eggs Rate) सुरु असलेली घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील लखनऊ, पटना, मुज्जफरपूर, रांची ही चार उत्तर भारतीय शहरे वगळता देशातील सर्व भागात अंड्याचे दर हे प्रति शेकडा 550 ते 590 रुपयांपर्यंत घसरले आहेत. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति शेकडापर्यंत पोहचले होते. मात्र आता त्यात जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मार्गशीर्ष महिना नुकताच संपला त्यातच संक्रांतीच्या सणाचा काळही सुरु होता. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये मागणी घटल्याने अंड्याच्या दरात (Eggs Rate) घसरण झाल्याचे पोल्ट्री उद्योगातून सांगितले जात आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

मागील आठवड्याच्या शेवटी असलेल्या दरांच्या तुलनेत आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) शेकडा 20 ते 40 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्यांचे शेकडा दर पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (580), पुणे (590), नागपूर (540) वाराणसी (610), लखनऊ (633), पटना (610), अलाहाबाद (586), कोलकाता (585), कानपुर (595), रांची (605), अहमदाबाद (585) , चेन्नई (570), बंगळुरू (550), विजयवाडा-आंध्रप्रदेश (530). दरम्यान, मागील आठवड्याच्या शेवटी असलेले 600 ते 610 रुपये प्रति शेकडा अंड्याचे दर आज 550 ते 590 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आले आहे.

राज्यात पंधरवड्यात 100 रुपयांनी घसरण

आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शहरांमध्ये अंड्याचे दर हे प्रति शेकडा 600 रुपयांच्या खाली आले आहेत. जे डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये जवळपास 670 ते 672 रुपये प्रति शेकडा इतक्या उच्चांकी पातळीपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले होते. तर आज उत्तरेकडील तीन ते चार शहरे वगळता अन्य शहरांमध्ये देखील अंडी दराने 600 रुपये प्रति शेकड्याच्या खाली घसरण नोंदवली आहे. त्यामुळे देशातील लेअर पोल्ट्री उद्योजकांना मोठा तोटा सहन करावा लागतो आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू ही दक्षिणेकडील राज्य सर्वात जास्त अंडी उत्पादन करतात. त्यामुळे आता या राज्यांतील पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना सध्या दर घसरणीमुळे नुकसान सोसावे लागत आहे.

error: Content is protected !!