Eggs Rate : अंडी दरात 25 ते 50 रुपयांनी घसरण; पहा.. आजचे अंड्याचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात राज्यातील अंडी दरात (Eggs Rate) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. चालू एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला असलेले 450 रुपये प्रति शेकडा हे अंड्याचे दर, राज्यात मागील आठवड्यात जवळपास 475 रुपयांपर्यंत वधारले होते. जे आज (ता.25) पुन्हा 425 रुपये प्रति शेकडा या चालू महिन्यातील निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. ज्यामुळे राज्यातील अंडी दर सध्या 25 ते 50 रुपये प्रति शेकड्याने घसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय आज देशपातळीवरील अनेक शहरांमध्ये देखील अंड्याचे दर (Eggs Rate) घसरलेले पाहायला मिळाले आहेत.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (425), पुणे (425), नागपूर (400), वाराणसी (424), लखनऊ (433), पटना (420), अलाहाबाद (419), कोलकाता (415), कानपुर (400), रांची (424), अहमदाबाद (440) , चेन्नई (460), बंगळुरू (435), विजयवाडा-आंध्रप्रदेश (380), लुधियाना (355), दिल्ली (385), हैद्राबाद (350), अजमेर (360), सुरत (435), इंदोर (390), चिंतुर-तामिळनाडू (453). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये चालू महिन्याच्या सुरवातीच्या तुलनेत सध्या अंड्याचे दर २५ ते ५० रुपये प्रति शेकडा इतके घसरलेले दिसून आले आहे.

दक्षिणेकडील तामिळनाडूमध्ये सर्वोच्च दर

केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात अंड्याच्या किंमती सलग तीन ते चार वेळा कमी झाल्या आहेत. त्यानंतर आता चालू महिन्यात देखील अंडी दर (Eggs Rate) देशातील काही भागांमध्ये थेट 50 रुपयांपर्यंत घसरलेले आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडू या राज्यात अंडयाचे दर हे 460 रुपये प्रति शेकडा या पातळीवर आहेत. तर महाराष्ट्राचा विचार करता, राज्यात सध्या अंडी दर 400 ते 425 रुपये प्रति शेकडा या पातळीवर स्थिर आहेत. ज्यामुळे सध्या उत्पादकांना अंडी दर घसरणीचा फटका सहन करावा लागत आहे. तर ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!