Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्यांचे शेकडा दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्याच्या सुरुवातीला अंडी दरात (Eggs Rate) जवळपास 15 ते 30 रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आता आठवडाभरापासून सुरु असलेली ही घसरण कायम असून, आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दर प्रति शेकडा 650 रुपयांपर्यंत खाली आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी अंड्याला प्रति शेकडा 700 रुपये दर मिळाला होता. त्यामुळे आता थंडीसोबतच अंड्यांच्या दरातही घसरण झाली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना परंतु अंडी दर (Eggs Rate) पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहेत.

प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

चालू आठवड्याच्या सुरुवातीला असलेल्या दरांच्या तुलनेत आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दरात शेकडा 10 ते 20 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्यांचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (650), पुणे (650), नागपूर (600) वाराणसी (650), लखनऊ (667), अलाहाबाद (652), कोलकाता (650), कानपुर (642), रांची (657), अहमदाबाद (642) , चेन्नई (615), बंगळुरू (615), विजयवाडा-आंध्रप्रदेश (585). अर्थात मागील आठवड्याच्या सुरुवातीला असलेले 630 ते 667 रुपये प्रति शेकडा अंड्याचे दर चालू आठवड्यात 630 ते 650 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आले आहे.

अंडी दराचा आलेख उतरता

केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही अंडी दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात अंड्याच्या किंमती सलग दोन वेळा टप्प्याटप्प्याने वाढून 700 रुपये प्रति शेकडा या विक्रमी पातळीवर पोहचल्या होत्या. मात्र आता उपलब्ध आकडेवारीनुसार उत्तरेकडील राज्यांसह देशातील अंडी दर मागील आठ दिवसांमध्ये जवळपास प्रति शेकडा 30-50 रुपयांनी कमी झाले आहे. आज देशातील सर्वाधिक दर उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ या ठिकाणी होता. डिसेंबर महिन्यात थंडीच्या कडाक्यामध्ये वाढ होऊन, अचानक मागणी वाढल्याने अंड्यांच्या दरात वाढ झाली होती. मात्र आता राज्यासह देशातील अंडी दरांमध्ये दोन टप्प्यात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.

error: Content is protected !!