हॅलो कृषी ऑनलाईन : दोनचा दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातील अंडी दरात (Eggs Rate) मोठी घट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात शेकडा 10 ते 20 रुपये घसरण नोंदवली गेली आहे. परिणामी आता अंड्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ‘संडे हो या मंडे’ रोज खाओ अंडे असे म्हणण्याची वेळ आहे. आज महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात शेकडा 10 ते 15 रुपये इतकी घसरण नोंदवली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेली घसरण आणि आजची घसरण पकडून अंडी दरात (Eggs Rate) प्रति शेकडा 40 ते 80 मोठी घसरगुंडी झालेली पाहायला मिळत आहे.
प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)
देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (580), पुणे (580), नागपूर (560), वाराणसी (557), लखनऊ (567), पटना (560), अलाहाबाद (557), कोलकाता (540), कानपुर (543), रांची (562), अहमदाबाद (580) , चेन्नई (610), बंगळुरू (560), विजयवाडा-आंध्रप्रदेश ( 515), लुधियाना (485), दिल्ली (525), हैद्राबाद (520), अजमेर (507), सुरत (510), इंदोर (535), चिंतुर-तामिळनाडू (603). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, आज देशातील अनेक भागांमध्ये दोन दिवसांच्या अंड्याच्या दराच्या तुलनेत अंड्याचे दर 10 ते 20 रुपयांपर्यंत घसरलेले दिसून आले आहे.
पोल्ट्री व्यवसाय अडचणीत
एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला (सोयाबीन, कांदा, कापूस) भाव मिळत नाहीये. तर आता दुसरीकडे शेतीशी संबंधित असलेल्या पोल्ट्री व्यवसायही अडचणीत आला आहे. कारण मागील आठ दिवसांत दोन वेळा झालेल्या दरघसरणीमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जवळपास मागील चार ते पाच दिवसांमध्ये सर्वच भागांमध्ये अंड्याचे दर जवळपास 40 ते 80 रुपये इतके घसरले आहेत. त्यामुळे ‘संडे हो या मंडे’ ही म्हण ग्राहकांना दिलासा देणारी असली तरी पोल्ट्री उत्पादकांसाठी मात्र ती चांगलीच अडचणीची ठरत आहे. मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही स्थिती ओढावल्याचे पोल्ट्री उद्योगातून सांगितले जात आहे.
पशु खाद्याचे अर्थात कोंबडी खाद्याचे दर वाढलेले आहे. तर पोल्ट्री उद्योजाकांना खाद्यासाठी मका उपलब्ध होत नाहीये. ज्यामुळे खाद्याच्या तुटवडा असल्याने ते वाढीव दराने खरेदी करावे लागत आहे. तर याउलट अंड्याचे दर मात्र घसरले आहेत. ज्यामुळे सध्या पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.