Eggs Rate : अंडी दरात पुन्हा वाढ; पहा… तुमच्या शहरातील आजचे अंड्यांचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यभर थंडीच्या कडाक्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी बाजारात अंड्यांची (Eggs Rate) मागणी वाढली असून, या आठवड्यात पुन्हा अंडी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. मागील आठवड्याच्या शेवटी 590 ते 600 रुपये शेकडा दराने अंडी (Eggs Rate) मिळत होती. मात्र, आज (ता.16) देशातील अनेक शहरांमध्ये घाऊक बाजारात अंडी 630 ते 650 रुपये प्रति शेकडा दराने विकली जात आहे. लखनऊ, मुज्जफरपूर, वाराणसी, पटना उत्तर भारतीय शहरांमधील घाऊक बाजारात आज अंड्यांना प्रति शेकडा 650 रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे दर (Eggs Rate Increases, Check Rate In Your City)

महाराष्ट्रातही मागील आठवड्याच्या तुलनेत अंडी दरात वाढ झाली असून, मुंबई घाऊक बाजारात अंड्यांचा प्रति शेकडा 631 रुपये तर पुणे येथील घाऊक बाजारात अंड्यांचा दर 630 रुपये प्रति शेकड्यापर्यंत पोहचला आहे. देशातील अन्य शहरांमध्ये प्रामुख्याने कोलकाता (635), अहमदाबाद (625), चेन्नई (610), दिल्ली (615), सुरत (635), विजयवाडा-आंध्रप्रदेश (582) आणि कानपुर (629), रांची (648) रुपये प्रति शेकडा दर अंड्यांना मिळाला आहे.

राज्यभरातून विरोध

राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच अशाप्रकारची समिती गठीत झाली आहे. त्यानंतरच्या काळात पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खंबीर भूमिका आयुक्‍त हेमंत वासेकर, सचिव तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपसून प्रलंबित असलेला शालेय पोषण आहारात अंडी समावेशाच्या मागणीचा मुद्दा अवघ्या काही महिन्यांतच निकाली निघाला आहे. मात्र असे असले तरी राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यात मोठा विरोध केला जात आहे.

शाळांना पाच रुपये दर निश्चित

राज्यातील जिल्हापरिषद शाळांना अंड्यांचा पुरवठा करण्यासाठी पाच रुपये प्रति नग असा घाऊक दर अंडी खरेदीसाठी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यामुळेच देशाच्या इतर भागाच्या तुलनेत महाराष्ट्रात अंडी दराने तेजी घेतली आहे. सोलापुरातील अंडी मागणी 25 हजार नगावर पोहोचली आहे. राज्याच्या इतर भागातही अशीच स्थिती आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अंड्यांचा दर प्रति शेकडा दर 630 रुपयांवर पोहोचला आहे.

error: Content is protected !!