Eggs Rate : अंड्याच्या दरामध्ये मोठी वाढ; प्रति नग इतका मिळतोय दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश (Eggs Rate) करण्यात आल्याने, राज्यातील अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामस्वरूप अंड्याच्या दरात (Eggs Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साडेतीन ते चार रुपये असा दर अंड्यांना मिळत होता. मात्र आता राज्यातील अनेक शहरांमध्ये अंड्याला 6 रुपये प्रति नग इतका दर मिळत आहे.

राज्यातील काही प्रमुख शहरांमधील घाऊक बाजारातील अंड्याचे दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहेत. राज्यात आज मुंबई येथे 6 रुपये, नागपूर येथे 5.80 रुपये, पुणे 6.01 रुपये असे काहीसे दर पाहायला मिळाले. थंडीत झालेली वाढ त्यासोबतच जिल्हा परिषद शाळांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आल्याने राज्यात अंड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी दरातही सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील उत्पादनात घट (Eggs Rate Increase In Maharashtra)

महाराष्ट्रात दररोज जवळपास 2 कोटी अंड्यांची विक्री होते. राज्यातील अंडी उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी असल्याने दररोज तमिळनाडू, आंध प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात अंडी राज्यात दाखल होतात. राज्यातील अमरावती जिल्ह्यात पोल्ट्री उद्योग मोठ्या प्रमाणात विस्ताराला असून, एकट्या अमरावती जिल्ह्यात दहा लाख अंडी उत्पादित होतात. विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांचे अंडी उत्पादन हे 20 लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, राज्यात मागणीच्या तुलनेत सध्या मोठ्या प्रमाणात अंड्यांचा तुटवडा जाणवत असून, पुरवठ्याअभावी दरात मोठी वाढ झाली आहे. असे पोल्ट्री व्यवसायिकांकडून सांगितले जात आहे. राज्यातील प्राथमिक शाळांच्या पोषण आहार योजनेत स्थानिक व्यवसायिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पोल्ट्री व्यवसायिकांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!