Eggs Rate : अंड्याच्या दरात प्रति शेकडा 100 रुपयांनी वाढ; वाचा… आजचे अंडयाचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्याभरात राज्यासह देशातील अंडी दरात (Eggs Rate) प्रति शेकडा सरासरी 100 रुपये इतकी उच्चांकी वाढ पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात चालू मे महिन्याच्या सुरुवातीला असलेले 400 ते 435 रुपये प्रति शेकडा हे अंड्याचे दर, आज जवळपास 540 रुपयांपर्यंत वधारले आहेत. अर्थात महाराष्ट्रातील अंडी दरात मागील आठ दिवसांमध्ये उच्चांकी 100 रुपये प्रति शेकडा इतकी वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय आज देशपातळीवरील अनेक शहरांमध्ये देखील अंड्याचे दर (Eggs Rate) चालू महिन्याच्या 1 तारखेच्या तुलनेत जवळपास 80 ते 100 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले आहेत. अर्थात सर्वच ठिकाणी अंडी दरात मोठी वाढ दिसून आली आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (540), पुणे (535), नागपूर (475), वाराणसी (500), लखनऊ (517), पटना (520), अलाहाबाद (510), कोलकाता (525), कानपुर (486), रांची (515), अहमदाबाद (510) , चेन्नई (570), बंगळुरू (560), विजयवाडा-आंध्रप्रदेश (465), लुधियाना (450), दिल्ली (475), हैद्राबाद (485), अजमेर (460), सुरत (510), इंदोर (485), चिंतुर-तामिळनाडू (563). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये चालू महिन्याच्या सुरवातीच्या तुलनेत सध्या अंड्याचे दर 80 ते 100 रुपये प्रति शेकडा इतके वाढलेले दिसून आले आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे मागणीत वाढ

दरम्यान, राज्यासह देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात मोठी वाढ दिसून आली आहे. प्रामुख्याने यामागे लोकसभा निवडणुकीमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे कारण सांगितले जात आहे. बहुधा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंडयाचे दर घसरलेले पाहायला मिळतात. मात्र, नुकतेच देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. अर्थात आणखी महिनाभर निकाल हाती येईपर्यंत तरी कार्यकर्त्यांचा गराडा कायम राहणार असल्याने अंड्यांची मागणी कायम रुजणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे सध्या वाढलेले अंडी दर हे हा संपूर्ण महिना कायम राहू शकतात. अशी शक्यता पोल्ट्री व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!