Eggs Rate : अंड्याच्या दरात 25 रुपयांनी वाढ; लोकसभा निवडणुकीमुळे वाढली मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील काही भागांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) वाढ दिसून आली आहे. प्रामुख्याने उद्या (ता.19) देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये काही भागांमध्ये अंड्यांची मागणी वाढली असून, परिणामी अंडी दरात प्रति शेकडा 25 रुपये इतकी वाढ दिसून आली आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (15 एप्रिलपर्यंत) महाराष्ट्रातील अंडी दर 450 रुपये प्रति शेकडापर्यंत घसरलेले होते. मात्र, आता त्यात 475 रुपये प्रति शेकडा इतकी वाढ नोंदवली गेली आहे. यामागे लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी मांस,अंडी, मासे यांची मागणी वाढली असल्याचे कारण सांगितले जात आहे. ज्यामुळे भर उन्हाळ्यात अंडी दरात (Eggs Rate) ही वाढ दिसून आली आहे.

प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (475), पुणे (470), नागपूर (425), वाराणसी (447), लखनऊ (429), पटना (450), अलाहाबाद (442), कोलकाता (468), कानपुर (429), रांची (448), अहमदाबाद (440) , चेन्नई (490), बंगळुरू (485), विजयवाडा-आंध्रप्रदेश (415), लुधियाना (386), दिल्ली (405), हैद्राबाद (410), अजमेर (390), सुरत (455), इंदोर (410), चिंतुर-तामिळनाडू (483). नोंदवले गेले आहेत. वरील आकडेवारीनुसार देशातील अनेक भागांमध्ये मागील पंधरवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात अंड्याचे दर 25 रुपये प्रति शेकडा इतके वाढले आहेत.

‘या’ राज्यांमध्ये वाढले अंडी दर

दरम्यान, अंडी दराच्या मागील 15 दिवसांच्या आढावा घेतल्यास, देशातील काही भागात अंड्याचे दर एका पातळीवर स्थिर आहेत. मात्र, त्याचवेळी राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये अंडयाच्या दरात 25 रुपये प्रति शेकडा इतकी वाढ नोंदवली गेली आहे. तर देशातील अन्य भागांचा विचार करता, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये अंडी दर प्रति शेकडा 25 रुपयांनी वाढले आहे. तर याउलट तेलंगणा या राज्यात हैद्राबाद या ठिकाणी अंडी दरात प्रति शेकडा सर्वोच्च 45 रुपये वाढ इतकी उच्चांकी वाढ नोंदवली गेली आहे. तर गुजरातच्या काही भागांमध्ये अंडी दरात 10 ते 15 रुपये प्रति शेकडा इतकी वाढ दिसून आली आहे.

error: Content is protected !!