Eggs Rate : अंडी दरात आज शेकडा 10 ते 15 रुपयांची वाढ; पहा आजचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात कडाक्याची थंडी पडल्याने अंड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढलेल्या मागणीमुळे आज अंडी दर (Eggs Rate) 700 रुपयांपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. बिहारची राजधानी पटना (700), तर उत्तरप्रदेशातील मुज्जफरपूर (700) आणि वाराणसी (700) या उत्तर भारतीय शहरांमध्ये अंडी दराने (Eggs Rate) शेकडा 700 रुपयांचा आकडा आज गाठला आहे.

प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दरात शेकडा 10 ते 15 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्यांचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (664), पुणे (665), वाराणसी (700), लखनऊ (700), अलाहाबाद (686), कोलकाता (675), कानपुर (671), रांची (686), अहमदाबाद (642) , चेन्नई (640), बंगळुरू (630), विजयवाडा-आंध्रप्रदेश (615). अर्थात मागील आठवड्यात 630 ते 650 रुपये शेकडा असलेल्या अंड्याच्या दराने या आठवड्यात 700 रुपये शेकडा दरापर्यंतचा पल्ला गाठला आहे.

मंदीचा उत्पादनास फटका

मागील काही महिन्यांमध्ये अंडी दरात सातत्याने मंदी अनुभवली गेली होती. त्यामुळे या काळात अंड्यांचे दर तीन ते साडेतीन रुपये प्रति नग पर्यंत खाली आले होते. मात्र त्यासाठीचा उत्पादन खर्च पोल्ट्री उत्पादकांना साडेचार रुपये येत होता. परिणामी या अंडी दराच्या मंदीचा फटका लेअर पोल्ट्री व्यवसायाला बसला होता. लेअर फार्म अंडी उत्पादनाचे जवळपास 25 टक्‍के फार्म बंद पडल्याचा दावा केला जात आहे.

शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आल्याने अंडी मागणीत महाराष्ट्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यातच थंडीचा काळ असल्याने मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने ही दरवाढ झाल्याचे पोल्ट्री व्यवसायातून सांगितले जात आहे. दरम्यान, पोल्ट्री उद्योगातील जाणकारांच्या माहितीनुसार, 20 जानेवारीपर्यंत अंडी आणि चिकनच्या दरात झालेली ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!