Eggs Rate : अंडी दरात विक्रमी वाढ; ‘पहा’ तुमच्या शहरातील आजचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशभरात कडाक्याची थंडी पडली असून, चिकन आणि अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अंडी दर (Eggs Rate) आणि चिकन दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज देशातील अंडी दर शेकडा 630 ते 687 रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. वाराणसी या ठिकाणी आज शेकडा अंड्यांना विक्रमी 687 रुपये इतका दर मिळाला आहे. तर चिकन दरही (Eggs Rate) घाऊक बाजारात 98 रुपये (जिवंत कोंबडी) प्रति किलोपर्यंत पोहचले आहेत.

प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्यांचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (654), पुणे (655), वाराणसी (687), लखनऊ (683), अलाहाबाद (681), कोलकाता (672), कानपुर (671), रांची (671), अहमदाबाद (642) , चेन्नई (630), बंगळुरू (620), विजयवाडा-आंध्रप्रदेश (605). अर्थात मागील आठवड्यात 630 ते 650 रुपये शेकडा असलेले अंड्याचे दर या आठवड्यात 630 ते 687 रुपये शेकडा दरापर्यंत पोहचले आहेत.

जानेवारीच्या मध्यावधीपर्यंत दरवाढ

पोल्ट्री उद्योगातील जाणकारांच्या माहितीनुसार, 20 जानेवारीपर्यंत अंडी आणि चिकनच्या दरात झालेली ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यत अंडी दरात वाढ पाहायला मिळाली होती. अंडी ही उष्ण असल्यामुळे शरीराला उष्णता मिळावी, यासाठी हिवाळ्यात प्राधान्याने अंड्यांचे सेवन केले जाते. त्याचबरोबर थंडीत अंड्यांचे उत्पादन कमी होत असल्याने आणि मागणी जास्त असल्याने अंड्यांच्या किंमतीत वाढ होते.

मागील पाच ते सहा दिवसांपासून चिकनच्या घाऊक दरातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी चिकनचा प्रति किलो 90 रुपये (जिवंत कोंबडी) असणारा दर सध्या 98 रुपये (जिवंत कोंबडी) प्रति किलोपर्यंत पोहचला आहे. मागील काही महिन्यांपासून चिकनचे दर 70 ते 75 रुपये प्रति किलोपर्यंत होते. मात्र सध्या नवीन वर्ष आणि ख्रिसमस नाताळाच्या पार्श्वभूमीवर देशातील चिकन दर वाढले असल्याचे जाणकार सांगत आहेत. आगामी महिनाभर तरी चिकनचे दर हे याच पातळीवर वाढलेले पाहायला मिळतील, असेही सांगितले जात आहे.

error: Content is protected !!