Eggs Rate : अंडी दर पूर्वपदावर; पहा तुमच्या शहरातील आजचे अंड्याचे दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेली अंडी दरातील (Eggs Rate) घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील अंडी दर पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति शेकडा या उच्चांकी पातळीवर पोहचले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून अंडी दरात टप्प्याटप्प्याने घसरण होऊन, अनेक शहरांमध्ये आज अंडी दर (Eggs Rate) 600 रुपये प्रति शेकडा किंवा त्याहून खालीपर्यंत घसरले आहेत.

प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)

चालू आठवड्याच्या सुरुवातीला असलेल्या दरांच्या तुलनेत आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) शेकडा 20 ते 40 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्यांचे शेकडा दर पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (600), पुणे (610), नागपूर (565) वाराणसी (630), लखनऊ (650), पटना (630), अलाहाबाद (610), कोलकाता (615), कानपुर (614), रांची (619), अहमदाबाद (605) , चेन्नई (580), बंगळुरू (580), विजयवाडा-आंध्रप्रदेश (555). अर्थात मागील आठवड्याच्या सुरुवातीला असलेले 630 ते 650 रुपये प्रति शेकडा अंड्याचे दर चालू आठवड्यात 600 ते 610 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आले आहे.

अंडी दराला उतरती कळा

केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही अंडी दरात घसरण झाली आहे. मागील डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अंड्याच्या किंमती सलग दोन वेळा टप्प्याटप्प्याने वाढून 700 रुपये प्रति शेकडा या विक्रमी पातळीवर पोहचल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने मागील दोन आठवड्यांपासून दोन टप्प्यात घसरण होत अंडी दर पुन्हा पूर्वपदावर आले आहेत. दरम्यान, आता अंडी दरात घसरण झाल्याने ‘संडे हो या मंडे’ या उक्तीप्रमाणे ग्राहकांच्या आहारातील अंड्याचे सेवन वाढणार आहे. मात्र अंडी उत्पादकांना दरात झालेल्या घसरणीचा फटका बसणार आहे.

उत्तरेकडील शहरांमध्ये अधिक दर

देशातील अंड्याच्या दरात गेल्या दोन महिन्यापासून चढ-उतार पाहायला मिळाला असला तरी उत्तर भारतीय शहरांमध्ये विशेषतः लखनऊ आणि पटनामध्ये अंड्याचे दर हे नेहमीच इतर शहरांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. आजही देशातील लखनऊ या ठिकाणी अंड्याला सर्वाधिक 650 प्रति शेकडा दर हा इतर शहरांपेक्षा अधिक असल्याचा दिसून आला आहे. मात्र आता या दर घसरणीमुळे पोल्ट्री व्यासायिकांवर परिणाम होऊन त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

error: Content is protected !!