हॅलो कृषी ऑनलाईन : चालू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अंडयाच्या दरात (Eggs Rate) चढ-उतार सुरूच असून, आज अंडी दरात मोठी घसरण झाली आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये ही घसरण नोंदवली गेली असून, अंडी दर सध्या प्रति शेकडा 600 रुपयांहून खाली घसरले आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्र आणि विशेषतः दक्षिणकडील काही भागांमध्ये अंड्याचे दर हे शेकडा 615 रुपयांपर्यंत वाढलेले होते. पूर्वेकडील पश्चिम बंगालमध्येही अंडी दराने 600 रुपये प्रति शेकडा हा आकडा पार केला होता. मात्र आज कोलकाता या ठिकाणी थेट 50 रुपयांनी घसरण होऊन अंडी दर 550 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली आले आहे. तर महाराष्ट्रातही अंडी दरात (Eggs Rate) प्रति शेकडा 20 ते 25 रुपयांनी घसरण नोंदवली गेली आहे.
प्रमुख शहरांमधील अंड्याचे दर (Eggs Rate Today In India)
देशातील प्रमुख शहरांमधील आजचे अंड्याचे शेकडा दर (Eggs Rate) पुढीलप्रमाणे आहे. मुंबई (594), पुणे (590), नागपूर (560), वाराणसी (567), लखनऊ (583), पटना (555), अलाहाबाद (567), कोलकाता (550), कानपुर (552), रांची (571), अहमदाबाद (580) , चेन्नई (610), बंगळुरू (580), विजयवाडा-आंध्रप्रदेश (525), लुधियाना (505), दिल्ली (532), हैद्राबाद (520), अजमेर (517), सुरत (585), इंदोर (545), चिंतुर-तामिळनाडू (603). नोंदवले गेले आहेत. दरम्यान, आज देशातील अनेक भागांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत अंड्याचे दर 20 ते 50 रुपयांपर्यंत घसरलेले दिसून आले आहे.
केवळ तामिळनाडूत अधिक दर
सध्याच्या घडीला देशातील अनेक भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. ज्यामुळे अंडी बाजारात मागणी घटली असून, त्याच्या थेट परिणाम दरांवर झालेला पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात चालू आठवड्याच्या तुलनेत उत्तरेकडील काही भागांसह देशभरात थंडीचे प्रमाण काहीसे वाढलेले होते. ज्यामुळे मागील आठवड्यात अंडी दराला काहीसा आधार मिळाला होता. तर महाराष्ट्रासारख्या राज्यात मागील आठवड्यात अंडी दरातील वाढ कायम होती. मात्र, आता तामिळनाडू राज्य वगळता देशात सर्वच भागात अंडयाचे दर प्रति शेकडा 600 रुपयांहून खाली घसरलेले आहेत.